Chanakya Niti : संपत्तीबाबत आचार्य चाणक्य यांचे ‘हे’ सल्ले नक्की वाचा…

Chanakya Niti : संपत्तीबाबत आचार्य चाणक्य यांचे 'हे' सल्ले नक्की वाचा...
Acharya-Chanakya

ज्या व्यक्तीकडे पैसा असतो त्या व्यक्तीचं आयुष्य सोपं होऊन जातं (Chanakya Niti), असं म्हटलं जातं. कारण, पैशांमुळे अनेक समस्या सुटतात.

Nupur Chilkulwar

|

Mar 29, 2021 | 3:05 PM

मुंबई : ज्या व्यक्तीकडे पैसा असतो त्या व्यक्तीचं आयुष्य सोपं होऊन जातं (Chanakya Niti), असं म्हटलं जातं. कारण, पैशांमुळे अनेक समस्या सुटतात. आचार्य चाणक्यही गरीबी हे विषप्रमाणे असल्याचं सांगतात. त्यांनी चाणक्य नीतीमध्ये संपत्तीबाबत अशा गूढ गोष्टी सांगितल्या आहेत ज्या प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हव्या (Everyone Should Know These Things About Money By Acharya Chanakya Said In Chanakya Niti).

1. आचार्य चाणक्य यांच्यानुसार, धन, संपत्ती यामुळे तुम्हाला समस्या सोडवण्यात मदत होते तसेच यामुळे समाजात तुम्हाला सन्मान आणि प्रतिष्ठाही मिळते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला संपत्ती साठवून ठेवाला हवी. जेणेकरुन भविष्यात येणाऱ्या अडचणीवेळी ती तुमच्या कामी येईल.

2. प्रत्येक व्यक्तीने अशा ठिकाणी वास्तव्य केलं पाहिजे जिथे शिक्षा आणि रोजगाराचं साधन असेल. रुग्णालयांची व्यवस्था असेल. जिथे व्यक्तीला मान-सन्मान आणि शुभ चिंतक मिळू शकतील.

3. जर तुम्हाला पैसा कमवायचा असेल तर एक लक्ष्य निर्धारित करा आणि त्या दिशेने खूप मेहनत करुन आपलं ध्येय कुठल्याही परिस्थितीत गाठा. यामुळे तुम्ही पैसाही कमवाल आणि मान-सन्मानही मिळेल. लक्ष्यहीन व्यक्ती कधीही कुठल्याच गोष्टीत यशस्वी होऊ शकत नाही.

4. प्रत्येक व्यक्तीमध्ये दान-पुण्य करण्याची भावना असायला हवी, दान-पुण्य हे व्यक्तीच्या पुढील जन्माचं भाग्य असते. पण, कुठल्याही गोष्टीची अति करणे चुकीचे आहे. बाली हा महादानी होता त्यामुळे त्याला अनेक समस्यांना सामोरे जावं लागलं होतं. त्यामुळे दानही नेहमी नियंत्रणात करा.

5. जर पत्नीची परीक्षा घ्यायची असेल तर पैसा-संपत्ती समाप्त झाल्यावर घ्या. स्वार्थी पत्नी अशा वेळी एकतर तुम्हाला सोडून जाईल, अथवा तिची तुमच्याप्रती वागणूक बदलेल. पण, आदर्श पत्नी धैर्याने तुम्हाला आधार देईल आणि तुम्हाला या दु:खातून बाहेर काढण्यासाठी शक्य असेल ती मदत करेल.

6. ज्या पैशांसाठी कुणाची हाजीहाजी करावी लागेल, जबरदस्ती त्यांची प्रशंसा करावी लागेल, आपल्या नितीमुल्यांचा त्याग करावा लागेल, धर्म बदलावा लागेल किंवा गरजेपेक्षा अधिक मेहनत करावी लागत असेल तर अशा पैशांचा मोह कधीही करु नये.

Everyone Should Know These Things About Money By Acharya Chanakya Said In Chanakya Niti

संबंधित बातम्या :

Chanakya Niti : ‘हे’ पाच गुण तुमच्यात असतील, तर तुम्ही जीवनात कुठली समस्या सोडवू शकता

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें