
अनेक लोक आपल्या जोडीदाराशी बऱ्याच गोष्टीत खोटं बोलतात. पण अनेक वेळा तुमच्या जोडीदाराला या गोष्टी सहन होत नाही. अशा वेळी तुमच्या नात्यामध्ये संशयाचे वादळ निर्माण होते. यामुळे नात्यात कटुता वाढू लागते. एकदा नात्यामध्ये संशय निर्माण झाला तर ते नाते खराब झालच म्हणून समजा.

रागामुळे कोणतेही नाते नष्ट होते. जर तुम्हाला खूप राग आला आणि तुम्ही तो तुमच्या जोडीदारावर काढलात किंवा सर्वांसमोर त्याला ओरडलात तर तुमचे नाते कमकुवत होते.

जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला कमी लेखत असाल, त्याला आदर देत नसाल, तर तुम्ही स्वतःच तुमचा आदर कमी करुन घ्याल. ज्या नात्यात आदर नाही, ते जास्त काळ टिकू शकत नाही. अशी नाती हळूहळू ओझं बनू लागतात.

वैवाहिक जीवनाचे दार भरवशावर असते. जे लोक आपल्या जोडीदारासोबत फसवणूक करतात, अशा लोकांवरील विश्वास उडतो. ज्या नात्याचा पाया डळमळीत होतो, ते नातं फार काळ टिकू शकत नाही.

पती-पत्नीचे आयुष्य एकमेकांशी निगडित असते. परिस्थिती कशीही असो, तुम्ही तुमच्या जोडीदाराशी त्याबद्दल मोकळेपणाने बोलले पाहिजे. जर तुम्ही गोष्टी लपवल्या तर त्यामुळे तुमचे नाते कमकुवत होईल. पण जर तुम्ही दोघेही प्रत्येक प्रसंगावर एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलले तर तुमचा जोडीदार परिस्थिती समजून घेईल आणि तुम्हाला साथ देईल.