
आर्य चाणक्य हे एक विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजही महत्त्वाच्या वाटतात. चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये मैत्रीबाबत महत्त्वाचा सल्ला दिला आहे. चाणक्य म्हणतात आयुष्यात मैत्री सारखी सुंदर गोष्ट कोणतीच नाही, जेव्हा आपण संकटात सापडतो, तेव्हा आपले नातेवाईक आपल्या मदतीला येतीलच हे सांगता येत नाही, परंतु जो खरा मित्र असतो, तो नेहमी आपल्या मित्राच्या मदतीला धावून जातो. इतिहासामध्ये मैत्रीचे अनेक दाखले आहेत. जेव्हा आपण त्याकडे पहातो तेव्हा आपल्याला मैत्री कशी असावी हे लक्षात येतं. चाणक्य पुढे म्हणतात मैत्री जरी सुंदर गोष्ट असली तरी कोणासोबतही मैत्री करताना काही गोष्टी या लक्षात घेतल्याच पाहिजेत, जर आपण तिथे चुकलो तर आयुष्यभर आपल्यावर पश्चातापाची वेळ येतो. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे त्याबद्दल?
विचार – चाणक्य म्हणतात जेव्हाही तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत मैत्री करता तेव्हा सर्वात आधी त्याचे विचार पाहा. जर तो व्यक्ती तुमच्या समविचारी असेल तर तुमच्यात मैत्री लवकर होईल, तसेच कधीही वाद होणार नाहीत. त्यामुळे मैत्री करताना नेहमी व्यक्ती आपल्या समविचारी आहे का? हे पाहावं. जर विचार जुळले तर अशी मैत्री दीर्घकाळ टिकते.
परिस्थिती – चाणक्य म्हणतात जेव्हा तुम्ही मैत्री करता तेव्हा, तुमची आर्थिक स्थिती लक्षात घ्या, जर एखाद्या व्यक्तीची आर्थिक परिस्थिती ही तुमच्या पातळीवर असेल तर तुम्ही अशा व्यक्तीसोबत मैत्री करू शकता, अशी मैत्री दीर्घकाळ टिकते. मात्र जेव्हा तुम्ही तुमच्यापेक्षा श्रीमंत व्यक्तीसोबत मैत्री करता तेव्हा काहीवेळा, काही प्रसंगी अशा व्यक्तीकडून तुमचं मन दुखावलं जाण्याची शक्यता असते, त्यामुळे मैत्रीमध्ये कटुता येते, मैत्री दीर्घ काळ टिकत नाही.
स्वार्थ – चाणक्य म्हणतात मैत्रीत स्वार्थ आला की अशी मैत्री संपलीच म्हणून समजा, त्यामुळे जर एखादा व्यक्ती त्याचा स्वार्थ म्हणून तुमच्याशी मैत्री करत असेल तर वेळीच सावध व्हा. किवां तुम्ही देखील मनात स्वार्थ ठेवून एखाद्या व्यक्तीसोबत मैत्री करू नका, जेव्हा हे संबंधित व्यक्तीच्या लक्षात येते, तेव्हा तुमची मैत्री जास्त वेळ टिकू शकत नाही, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)