या 3 गोष्टींवर खर्च करताना कधीही कंजूसपणा करू नका, अन्यथा होऊ शकते आर्थिक नुकसान!

आचार्य चाणक्य यांनी यश आणि समृद्धीचे अनेक मंत्र सांगितले आहेत. पण त्यांच्या मते या 3 ठिकाणी पैसे खर्च करताना कधीच विचार करून नका असं म्हटलं आहे. जाणून घ्या सविस्तर

| Updated on: Jun 11, 2026 | 3:47 PM
1 / 5
अनेक लोक आयुष्यभर कठोर परिश्रम करतात, तरीही त्यांना अपेक्षित आर्थिक यश मिळत नाही. तर काहींकडे पैसा असूनही सुख, समाधान आणि समाजातील मान-सन्मान टिकून राहत नाही. याबाबत प्राचीन भारतीय तत्त्वज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञ चाणक्य यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले आहे.

2 / 5
चाणक्यांच्या मते, पैसा कमावणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच तो योग्य ठिकाणी खर्च करणेही आवश्यक आहे. त्यांनी अशा तीन क्षेत्रांचा उल्लेख केला आहे, जिथे केलेली गुंतवणूक व्यक्तीच्या यश, सुख आणि समृद्धीचा पाया मजबूत करू शकते.

3 / 5
चाणक्यांच्या मते, विद्या हे सर्वश्रेष्ठ धन आहे. भौतिक संपत्ती चोरीला जाऊ शकते किंवा नष्ट होऊ शकते, मात्र ज्ञान कायम व्यक्तीसोबत राहते. नवीन कौशल्ये शिकणे, वाचन करणे आणि सतत ज्ञान वाढवणे हे दीर्घकालीन यशाचे रहस्य असल्याचे ते सांगतात.

4 / 5
संकटकाळात साथ देणारी माणसे हीच खरी संपत्ती असते, असे चाणक्य मानतात. सोशल मीडियावरील हजारो ओळखींपेक्षा विश्वासू आणि प्रामाणिक नातेसंबंध अधिक मौल्यवान असतात. नातेसंबंध टिकवण्यासाठी प्रामाणिकपणा, कृतज्ञता व्यक्त करणे आणि एकमेकांना वेळ देणे आवश्यक आहे.

5 / 5
चाणक्यांच्या मते, जो व्यक्ती स्वतःच्या विकासासाठी वेळ आणि पैसा खर्च करत नाही, ती मानसिकदृष्ट्या गरीबच राहते. आत्मविकास म्हणजे दररोज काहीतरी नवीन शिकणे, शिस्तबद्ध जीवन जगणे, आत्मपरीक्षण करणे आणि ध्यानधारणा करणे.  (डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही.)

Follow Us