Chanakya Niti : या चार लोकांशी आयुष्यात कधीच मैत्री नको, पश्चताप कराल, चाणक्य यांनी दिला मोलाचा सल्ला

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, आपल्या या ग्रंथामध्ये मैत्रीबद्दल चाणक्य यांनी अनेक गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. चाणक्य म्हणतात मैत्री इतकं सुंदर नातं या जगात कोणतंही नाही, परंतु तुम्ही जेव्हा चुकीच्या लोकांसोबत मैत्री करतात, तेव्हा तुमच्यावर पश्चतापाची वेळ येते.

Chanakya Niti : या चार लोकांशी आयुष्यात कधीच मैत्री नको, पश्चताप कराल, चाणक्य यांनी दिला मोलाचा सल्ला
Chanakya
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 22, 2026 | 9:47 PM

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी मैत्रीबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात माणसाच्या आयुष्यात मैत्री इतकी सुंदर दुसरी कोणती गोष्ट असूच शकत नाही, जेव्हा तुमच्यावर कठीण वेळ असते, तेव्हा तुमचे नातेवाईक तुमची साथ सोडतात, परंतु जो खरा मित्र असतो, तो तुमची साथ कधीही सोडत नाही. तो तुमच्यावर संकट आलेलं असताना तुमच्या मदतीला धावून येतो आणि तुमच्यावरच संकट दूर करतो. परंतु जेव्हा तुम्ही चुकीच्या लोकांसोबत मैत्री करता, तेव्हा मात्र तुमच्यावर पश्चतापाची वेळ येते,. त्यामुळे आपले मित्र कोण आहेत? ते कसे आहेत? हे तुम्हाला ओळखता आलंच पाहिजे, जर तुम्ही तुमचा खरा मित्र कोण आणि स्वार्थासाठी तुमच्यासोबत मैत्री करणारा कोण? हे ओळखू शकलात तर तुम्ही आयुष्यात यशस्वी व्हाल असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य नीतीमध्ये नेमकं काय सांगितलं आहे? त्याबद्दल.

स्वार्थी लोक – आर्य चाणक्य म्हणतात जे लोक स्वार्थी असतात अशा लोकांसोबत तुम्ही कधीही मैत्री करू नका, कारण असे लोक केवळ त्यांच्या स्वार्थ साधण्यापुरतीच तुमच्याशी मैत्री करतात. तुम्ही अडचणीत असाल तरी देखील असे लोक त्यांचाच फायदा पहातात. जेव्हा त्यांचा स्वार्थ पूर्ण होतो, तेव्हा असे लोक पुन्हा तुम्हाला कधी भेटत देखील नाहीत, ते तुम्हाला साधी ओळख देखील दाखवत नाहीत, त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी सावध राहावं असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

मूर्ख लोक – चाणक्य म्हणतात जे लोक मूर्ख आहेत, त्यांच्याशी केलेली मैत्री एक दिवस तुम्हाला मोठ्या संकटात टाकू शकते, त्यामुळे अशा लोकांसोबत तुम्ही कधीही मैत्री करू नका. अशा लोकांनी दिलेल्या सल्ल्यांमुळे भविष्यात तुमचं फार मोठं नुकसान होऊ शकतं, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

व्यसनाधीन मित्र – चाणक्य म्हणतात जे लोक व्यसनाच्या आहारी गेले आहेत, अशा लोकांसोबत तुम्ही चुकूनही मैत्री करू नका, एक गोष्ट लक्षात ठेवा चुकीच्या गोष्टी शिकण्यासाठी फार वेळ लागत नाही, जर तुमच्या मित्राकडे एखादी चांगली गोष्ट असेल तर ती शिकण्यासाठी तुम्हाला कदाचित बराचवेळ लागेल, परंतु तुमच्या मित्राला एखादी वाईट गोष्टीची सवय असेल तर अशी सवय तुम्ही लगेच शिकतात, त्यामुळे अशा मित्रांपासून तुम्ही नेहमी लांब राहावं.

नकारात्मक मित्र – चाणक्य म्हणतात या जगात असे काही व्यक्ती असतात जे कायम नकरात्मकच विचार करत असतात, त्यामुळे अशा मित्रांची कधीही संगत करू नये, यामुळे तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं, अशा लोकांपासून कायम सावध राहावं, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 

Follow Us