Chanakya Niti | ही 3 कामं करताना कधीही दिरंगाई करु नका, नाहीतर नुकसान झालेच म्हणून समजा

| Updated on: Jan 27, 2022 | 4:07 PM

माणसाने  3 गोष्टी करताना कधीही दिरंगाई करु नये. नाहीतर खूप नुकसान सहन करावे लागते चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.

Chanakya Niti | ही 3 कामं करताना कधीही दिरंगाई करु नका, नाहीतर नुकसान झालेच म्हणून समजा
chankaya niti
Follow us on

मुंबई : आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक समस्यांचा सामना केला. त्याच अनुभवांच्या जोरावर त्यांनी आपले अनुभव चाणक्या नीती (Chanakya Niti ) मधून सर्वांसमोर आणले. आचार्य केवळ विलक्षण बुद्धिमत्तेचे धनी नव्हते, तर ते सर्व विषयांचे जाणकारही होते. त्यांनी व्यक्तींमधील काही दोष चाणक्यनीती मध्ये मांडले होते. जर आपण त्या दोषांवर काम केले नाही तर भविष्यात आपले नुकसान नक्की होते. आपल्याला आयुष्यात अनेक गोष्टी कराव्या लागतात.काही कामे अशी असतात जी पुढे ढकलली तरी तुमचे नुकसान होते. पण जर तुम्ही तसे केले नाहीत तर तुमचे नुकसान होते. माणसाने  3 गोष्टी करताना कधीही दिरंगाई करु नये. नाहीतर खूप नुकसान सहन करावे लागते चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.

1. जन्म घेतलेली प्रत्येक व्यक्ती सर्व कर्तव्ये आणि जबाबदाऱ्यांनी बांधलेली असते. आचार्य चाणक्य यांचे मत होते की, आपली वैयक्तिक कामे वेळेवर करण्यासोबतच, निरोगी राहून कौटुंबिक जबाबदाऱ्याही पार पाडल्या पाहिजेत. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या आजाराने त्याला घेरले आणि त्याला त्याचे काम करता येत नाही, तर त्या व्यक्तीचा मृत्यू देखील अनिश्चित असतो. त्यामुळे अशा कामांसाठी म्हातारपणी पर्यंत थांबू नका. तुमची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या वेळेत पार पाडल्यास तुम्हाला समाजात मान-सन्मान मिळतो.

2. दान माणसाची पापे दूरच करतात असे पुराणात मानले जाते. शास्त्रात दानाचे महत्त्व सांगताना कमाईचा काही भाग दानात खर्च करावा असे सांगितले आहे. दानधर्म करण्यासाठी श्रीमंत होण्याची किंवा वृद्धापकाळाची वाट पाहू नये. दान केल्यामुळे आपण एकमेकांचे दु:ख समजू शकतो. त्यामुळे आपण आपल्या संपत्तीची योग्य वापर केला पाहिजे.

3. आचार्यांचा असा विश्वास होता की या व्यतिरिक्त जर तुमच्या मनात कोणतेही महत्त्वाचे काम करण्याचा विचार असेल तर ते उद्यापर्यंत पुढे ढकलू नका. लवकरात लवकर तोडगा काढण्याचा प्रयत्न करा कारण उद्याची खात्री नाही. पण जर एखादा वाईट विचार आला तर तो नेहमी टाळण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे तुमचे अधिक नुकसान होणार नाही.

(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

संबंधीत बातम्या : 

Astro Remedies of Jaggery | नोकरी हवीय ? घरात सतत वाद होत आहेत मग पुराणात सांगितलेले गुळाचे हे 5 उपाय नक्की वापरुन पाहा

Tulsi Benefits | भगवान विष्णूच्या आवडत्या तुळशीचे धार्मिक महत्त्व काय ? जाणून घ्या रंजक गोष्टी

27January 2022 Panchang | 27 जानेवारी 2022, गुरुवारचे पंचांग, ​​कसा जाईल दिवस?, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि राहुकाळ