Chanakya Niti : आयुष्यात या चार गोष्टी कधीच विसरू नका, चाणक्य यांनी दिला मोलाचा सल्ला

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात प्रत्येकाच्या आयुष्यात अशा चार गोष्टी असतात, त्या कधीही विसरता कामा नये, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

Chanakya Niti : आयुष्यात या चार गोष्टी कधीच विसरू नका, चाणक्य यांनी दिला मोलाचा सल्ला
chanakya
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 05, 2026 | 7:10 PM

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजही अनेकांना मार्गदर्शक ठरतात. चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये माणसाने आयुष्य कसं जगावं? याचं थोडक्यात सार सांगितलं आहे. चाणक्य म्हणतात माणसाच्या आयुष्यात अशा काही गोष्टी असतात, ज्या कधीही विसरता कामा नये, या गोष्टीच तुम्हाला सतत तुमच्या कर्तव्याची जाणीव करून देत असतात आणि त्यातच तुमचं हीत आहे. मात्र तुम्हाला जर या गोष्टींचा विसर पडला तर मग मात्र तुम्ही दिशाहीन व्हाल, हळुहळु तुमच्या हातातून सर्व गोष्टी निसटून जातील, त्यामुळे कधीही या गोष्टींचा विसर पडू देऊ नका, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चला तर मग या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत? आणि चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल जाणून घेऊयात.

कर्ज – चाणक्य म्हणतात माणसाने त्याच्या आयुष्यात कधीच कर्ज घेऊ नये, अगदी खूपच गरज असेल तरच कर्ज घ्यावं. मात्र तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीकडून कर्ज घेता किंवा तुमच्या डोक्यावर कर्ज असतं, तेव्हा अशावेळी कधीही त्या कर्जाचा विसर पडू देऊ नका, जर तुम्हाला तुमच्यावर असलेल्या कर्जाचा विसर पडला तर तुमचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

Loading...

अपमान – चाणक्य म्हणतात जर समजा तुमचा एखाद्या व्यक्तीकडून अपमान झाला असेल तर तो अपमान कधीही विसरू नका, कारण काही अपमान असे असतात जे तुम्हाला सुधारण्याची संधी देतात, त्यामुळे कधीही कोणाकडूनही झालेला अपमान विसरू नका असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

उपकार – चाणक्य म्हणतात जर एखाद्या व्यक्तीने तुमची मदत केली असेल, तुम्हाला जर त्याने संकट काळातून बाहेर काढलं असेल तर अशा व्यक्तीचे उपकार आयुष्यभर विसरू नका, कारण त्याने तुम्हाला संकट काळात मदत केलेली असते. उलट जेव्हा त्या व्यक्तीला गरज असेल तेव्हा त्याच्या मदतीला धावून जा.

मैत्री – चाणक्य म्हणतात मैत्री नेहमी काळजीपूर्वक करा, परंतु जर एखाद्या सोबत मैत्री झाली तर त्याला आयुष्यभर कधीही अंतर देऊ नका, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us