Chanakya Niti : आयुष्यात या तीन चूका कधीच करू नका, पश्चाताप करायला पण वेळ भेटणार नाही

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील कालसुसंगत वाटतात. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे ? त्याबद्दल.

Chanakya Niti : आयुष्यात या तीन चूका कधीच करू नका, पश्चाताप करायला पण वेळ भेटणार नाही
Chanakya
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 06, 2026 | 6:32 PM

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील मार्गदर्शनाचं काम करतात. आजही चाणक्य यांचे विचार अनेकांना जगण्याची प्रेरणा देतात, चाणक्य यांना त्यांच्या काळात जे अनुभव आले त्या अनुभवाचं थोडक्यात सार चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये सांगितलं आहे. माणसाने आयुष्य कसं जगावं? आयुष्य जगत असताना कोणत्या चुका टाळाव्यात आणि काय करावं? अशा एक ना अनेक गोष्टी चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात काही चुका अशा असतात, त्या जर तुमच्या हातून घडल्या तर तुम्ही फार मोठ्या संकटात सापडू शकतात, त्यावेळी तुम्हाला पश्चताप करायला देखील वेळ मिळत नाही, चला तर मग जाणून घेऊयात या तीन चुका नेमक्या कोणत्या आहेत? आणि चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

शिक्षण – चाणक्य म्हणतात आयुष्यात काहीही झालं तरी चालेल, परंतु अडाणी कधीच राहू नका, जर तुम्ही सुशिक्षित असाल तर हा समाज तुमचा सन्मान करेल. तुमचा समाजात आदर वाढेल. तुम्हाला रोजगाराच्या नव नवीन संधी प्राप्त होतील. परंतु जर तुम्ही सुशिक्षित नसाल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात जगण्यासाठी कष्टाची कामं करावी लागतील. समाजात तुम्हाला मान-सन्मान मिळणार नाही. तसेच तुम्हाला लिहिता वाचता येत नसल्यामुळे हा समाज तुमची फसवणूक करेल, तुम्हाला जगणं अवघड होईल. परंतु तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

खर्च – चाणक्य म्हणतात तुमचं खर्चावर नियंत्रण हे हवच जर तुमचं खर्चावर नियंत्रण नसेल तर तुम्ही अडचणीत येऊ शकता, त्यामुळे आपलं उत्पन्न किती आहे, आणि आपला खर्च किती होतोय? याचा योग्य ताळमेळ तुम्हाला साधता आलाच पाहिजे. उत्पन्नापेक्षा कधीही आपला खर्च जास्त नसावा, असं चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये सांगितलं आहे.

शत्रूत्व – चाणक्य म्हणतात या समाजात वावरताना नेहमी तुमच्या डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर असावी, सर्वांना मित्र बनवता आलं पाहिजे, आपला कोणीही शत्रू नसेल याची काळजी घ्यावी, असा सल्ला चाणक्य यांनी दिला.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us