AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाळासाहेबांची शिवाजी महाराजांसोबत बरोबरी होऊ शकते का? शिवसेना भवनावरील फोटो काढा अन्यथा… सदावर्तेंचा अल्टिमेटम

Gunaratna Sadavarte : ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी सेनाभवनावरील शिवाजी महाराजांचा पुतळा आणि बाळासाहेबांचा फोटो आहे. यावरून सदावर्तेंनी प्रश्न उपस्थित केला आहे.

बाळासाहेबांची शिवाजी महाराजांसोबत बरोबरी होऊ शकते का? शिवसेना भवनावरील फोटो काढा अन्यथा... सदावर्तेंचा अल्टिमेटम
Sadavarte and Raj ThackerayImage Credit source: Google
| Updated on: Sep 06, 2026 | 6:48 PM
Share

पुण्यातील एका महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो महापुरूषांच्या फोटोंच्या रांगेत असल्याने मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी तो हटवला होता. यामुळे भाजप आणि मनसेत चांगलीच जुंपली आहे. अशातच आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधानांच्या फोटोबाबत भाष्य केले आहे. राज ठाकरे यांनी एका कार्यक्रमात बोलताना म्हटले की, आमचा अमित पुण्याला गेला असता फोटो काढण्यावरून वाद झाला. छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, फुले यांच्या रांगेत दुसरे कोणी नाही बसू शकत. सरकारी कार्यालयात PM मोदींचा फोटो असायला हवा कारण ते पीएम आहेत. पण फोटो दुसऱ्या भिंतीवर असावा असं विधान केलं आहे. यावरून आता ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी भाष्य केले आहे.

बाळासाहेबांचा फोटो हटवा, अन्यथा…

राज ठाकरे यांच्या विधानावर बोलताना गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले की, तुमच्या मुलाला विचारा शिवरायांच्या पुतळ्याच्या फोटोच्या वर बाळासाहेब ठाकरेंना बसवलं जाऊ शकतं का? सेनाभवनावरील फोटोवरुन सदावर्तेंनी हा प्रश्न उपस्थित केला आहे. पुढे बोलताना सदावर्ते यांनी म्हटले की, शिवसेना भवनाच्या आत फोटो आहे तो प्रोटोकॉल प्रमाणे आहे का? शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो एकत्र आहे.

बाळासाहेब ठाकरेंचा फोटो काढा अन्यथा…

पुढे बोलताना सदावर्ते यांनी म्हटले की, प्रबोधनकार ठाकरे यांना लोक मानतात, मात्र बाळ ठाकरे हे एका पक्षाचे प्रमुख. राज ठाकरे तुम्ही किती मिनिटात किती तासात हे फोटो काढता? त्यांची बरोबरी नसताना बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे, गुन्हा दाखल करणार का? राज ठाकरे यांची अवस्था लोका सांगे ब्रम्हज्ञान. शिवसेना भवनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या वर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे, त्यांचा फोटो मोठा आहे, ते वर ठेवले जाऊ शकतात का? सांगा त्या उद्धवला बाळासाहेबांचे तो फोटो काढायला. हा अपमान सहन केला जाणार नाही. जे लोक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानतात त्यांना विनंती करतो, मी यांना 15 दिवसांची मुभा देतो, 15 दिवसांत हा फोटो जर काढला नाही तर मी स्वतः न्यायालयात जाऊ. गरज पडल्यास उपोषण करेल पण शिवरायांचा अपमान सहन करणार नाही.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली