Chanakya Niti : एकदा या चार गोष्टी हातातून सुटल्या की पुन्हा परत कधीच येत नाहीत, नंतर किंमत कळते

आर्य चाणक्य हे एक महान विचावंत होते, ते म्हणतात माणसाच्या आयुष्यात अशा काही गोष्टी असतात ज्या त्याच्या हातातून सुटल्या की पुन्हा कधीही येत नाहीत. पण जेव्हा या गोष्टी त्याच्याकडे असतात तेव्हा त्याला या गोष्टींची किंमत नसते. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

Chanakya Niti : एकदा या चार गोष्टी हातातून सुटल्या की पुन्हा परत कधीच येत नाहीत, नंतर किंमत कळते
chanakya niti
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 22, 2026 | 9:20 PM

चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य म्हणतात की माणसानं समाजात वावरताना प्रत्येत पाऊल हे विचारपूर्वकच टाकलं पाहिजे. कारण तुमचं जर एक पाऊल चुकलं तर त्याची आयुष्यात तुम्हाला फार मोठी किंमत मोजावी लागते. त्यामुळे तुम्ही जो निर्णय घेणार आहात, तो विचारपूर्वक घ्या. प्रत्येकाच्या आयुष्यात अशा चार गोष्टी असतात, ज्या एकदा हातातून सुटल्या की त्या परत कधीही परत येत नाहीत. जर तुम्ही या गोष्टींमध्ये चूक केली तर तुम्हाला भविष्यात त्याची फार मोठी किंमत मोजावी लागू शकतो. त्यामुळे मानसानं नेहमी सावध राहावं, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

वेळ – चाणक्य म्हणतात वेळ ही अशी गोष्ट आहे, जी एकदा तुमच्या हातातून सुटली तर ती पुन्हा कधीही येत नाही. त्यामुळे प्रत्येकाने वेळेचं महत्त्व जाणलं पाहिजे. ज्या व्यक्तीला वेळेची किंमत नाही, असा व्यक्ती त्याच्या आयुष्यात कधीही प्रगती करू शकणार नाही. प्रत्येक गोष्ट ही वेळेतच व्हायला हवी. यासाठी चाणक्य एक उदाहरण देखील देतात. चाणक्य म्हणतात की तुमचं जेव्हा शिक्षणाचं वय असतं, तेव्हा तुम्ही जर शिक्षण घेतलं नाही तर त्यामुळे भविष्यात तुमचं फार मोठं नुकसान होतं. मात्र पुन्हा ती वेळ तुमच्या आयुष्यात कधीच येत नाही, कारण एकदा शिक्षणाचं वय निघून गेलं की तुम्ही तुमच्या कामांमध्ये व्यस्त होतात.

वचन – चाणक्य म्हणतात एकदा तोंडातून शब्द गेला की तो पुन्हा कधीच येत नाही, त्यामुळे कोणालाही शब्द देताना तो काळजीपूर्वक दिला पाहिजे. एखाद्याला वचन देताना आपण ते पूर्ण करू की नाही? याचा वचन देण्यापूर्वीच विचार केला पाहिजे. कोणताही विचार न करता तुम्ही जर एखाद्या व्यक्तीला वचन दिलं तर तुम्ही संकटात सापडू शकता.

विश्वास – चाणक्य म्हणतात विश्वास ही एक अशी गोष्ट आहे. जो एकदा तुटला की पु्न्हा कधीही परत मिळवता येत नाही. त्यामुळे कधीच कोणाच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका.

शब्द – चाणक्य म्हणतात शब्द अशी गोष्ट आहे, की एखाद्या व्यक्तीला तुम्ही शब्दाने केलेली जखम कधीच बरी होऊ शकत नाही. तसेच एकदा तुमच्या तोंडातून एखादा शब्द गेला तर तो कधीही परत घेता येत नाही. त्यामुळे नीट विचार करूनच बोला.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us