Chanakya Niti : या चार गोष्टी माणसाने आयुष्यभर लक्षात ठेवाव्यात, जीवन होईल स्वर्गापेक्षाही सुंदर

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्या आजच्या काळात देखील मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात अशा काही गोष्टी असतात, ज्या माणसाने कायम लक्षात ठेवल्या पाहिजेत.

Chanakya Niti : या चार गोष्टी माणसाने आयुष्यभर लक्षात ठेवाव्यात, जीवन होईल स्वर्गापेक्षाही सुंदर
Chanakya Niti
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 13, 2026 | 9:18 PM

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या मानवी जीवनात मार्गदर्शक ठरतात. माणसाने जीवन कसं जगावं? काय करावं आणि काय करू नये? याच थोडक्यात सार चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये सांगितलं आहे. चाणक्य म्हणतात माणसाचं चारित्र्य एका काचेच्या भांड्यासारखं असतं, जसं एखाद्या काचेच्या भांड्याला एकदा तड गेला की ते पुन्हा कधीही दुरूस्त होत नाही, तसंच माणसाच्या चारित्र्याचं देखील आहे, एकदा का तडा गेला की पुन्हा कोणीही तुमच्यावर विश्वास ठेवत नाही. चाणक्य म्हणतात अशा काही गोष्टी असतात, ज्या माणसाने कायम लक्षात ठेवल्या पाहिजेत, याच गोष्टींमुळे तुमची प्रगती तर होईलच परंतु तुमचं आयुष्य स्वर्गाहूनही सुंदर होईल, चला तर मग जाऊन घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

संयम – चाणक्य म्हणतात आयुष्यात अनेकदा तुमची परीक्षा पहाणारे प्रसंग येतात. तुमच्या आयुष्यात अनेकदा कठीण काळ येतो. परंतु अशा अवस्थेमध्ये माणसाने कायम संयम ठेवला पाहिजे. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कोणतीही वेळ ही बसून राहत नाही, सावली नंतर ऊन ऊन्हानंतर सावली हा खेळ निरंतर सुरूच असतो. त्यामुळे माणसाने नेहमी संयम ठेवला पाहिजे, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

Loading...

थोरा मोठ्यांचा आदर – चाणक्य म्हणतात माणसाने नेहमी थोरा मोठ्यांचा आदर करायला शिकलं पाहिजे. कारण या लोकांनी त्यांच्या आयुष्यात खूप काही चांगले वाईट अनुभव घेतलेले असतात. तुम्ही त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. नक्कीच तुमची प्रगती होईल.

कष्ट – चाणक्य म्हणतात कष्टाला कधीही लाजू नका, आयुष्यात जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला कष्टाशिवाय पर्याय नाही, जो व्यक्ती जेवढा जास्त कष्ट करेल तेवढा तो अधिक यशस्वी होईल, मग त्याचं क्षेत्र कोणतंही असू द्या, असं चाणक्य म्हणतात.

अहंकार – चाणक्य म्हणतात माणसाला त्याच्या आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल, शांती पाहिजे असेल तर त्याने अहंकार सोडून द्यावा.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us