Chanakya Niti : ज्या लोकांना या दोन सवयी असतात, ते आयुष्यभर सुखी होऊच शकत नाहीत

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये मानवाला आयुष्य जगण्याचा मार्ग सांगितला आहे. चाणक्य म्हणतात समाजात असे काही लोक असतात जे आपल्या आयुष्यात कायम आनंदी असतात, तर असेही काही लोक असतात जे आपल्या आयुष्यात कायम दु:खी असतात.

Chanakya Niti : ज्या लोकांना या दोन सवयी असतात, ते आयुष्यभर सुखी होऊच शकत नाहीत
chanakya niti
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 21, 2026 | 8:20 PM

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये माणसाने आयुष्य कसं जगावं? याचं सार सांगतिलं आहे. चाणक्य म्हणतात समाजात दोन प्रकारचे लोक असतात. एक जे लोक कायम आनंदी असतात, तर दुसर्‍या प्रकारचे लोक जे कायम दु:खी असतात. जे लोक दु:खी असतात त्यांना तुम्ही काहीही करा ते कधीच आनंदी किंवा समाधानी दिसणार नाहीत. कारण अशा लोकांच्या स्वभावात दोन गोष्टी असतात. या दोन गोष्टीच अशा लोकाच्या प्रगतीमधील सर्वात मोठा अडथळा ठरतात. त्यामुळे असे लोक कायम दु:खी असतात. चला तर मग जाणून घेऊयात या दोन गोष्टी नेमक्या कोणत्या? आणि आर्य चाणक्य यांनी अशा स्वभावाच्या माणसांबद्दल नेमकं काय सांगितलं आहे? त्याबद्दल.

संशयी स्वभाव – आर्य चाणक्य म्हणतात काही लोक या समाजात असे असतात, ज्यांचा स्वभाव हा कायम संशयी असतो. असे व्यक्ती आपल्या आयुष्यात ज्या -ज्या व्यक्तीला भेटतात. त्या-त्या व्यक्तींबद्दल यांच्या मनात संशय असतो. इथे प्रत्येक जण माझं वाईटच करणार आहे, अशी भावना यांच्या मनात असते. त्यामुळे अशा लोकांचं मन कायम अस्थिर असतं, आणि ज्या माणसाचं मन अस्थिर आहे, असा माणूस सुखाने जगूच काय पण झोपू सुद्ध शकत नाही, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चाणक्य पुढे म्हणतात की अशा माणसांच्या मनात कायम दुसऱ्याबद्दल संशय असतो. त्यामुळे ही माणसं स्वत:तर दु:खी असतातच परंतु त्यांच्या या स्वभावाचा परिणाम हा त्यांच्या कुटुंबावर देखील होतो. अशा व्यक्तीचं घर कायम अशांत आणि अस्थिर असतं. अशा लोकांच्या मनाचा प्रचंड गोंधळ उडालेला असतो, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

मत्सर – चाणक्य म्हणतात जे लोक कायम दुसऱ्याचा मत्सर करतात असे लोक त्यांच्या आयुष्यात कधीच सुखानं राहू शकत नाहीत. म्हणजे जर एखाद्याने नवीन घर बांधलं तर असे लोक समोरच्या व्यक्तीच्या आनंदात कधीच आनंद मानत नाहीत, उलट ते त्या व्यक्तीचा द्वेष करतात. याचा परिणाम म्हणजे असे लोक आपल्या आयुष्यात प्रचंड अस्वस्थ असतात. असे लोक कायम कोणाचीही प्रगती पाहून आनंदी होण्याऐवजी आपल्याकडे ती वस्तू नाही, म्हणून दु:खी होतात. त्यामुळे मानसाने जर आनंदी राहायचं असेल तर समाधानी राहिलं पाहिजे असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 

Follow Us