
आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी मानवाच्या दैनंदिन जीवनात उपयोगी पडतील अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. आयुष्यात यश कसं मिळवायचं? याबाबत अनेक गोष्टी चाणक्य यांनी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात असे अनेक लोक असतात की जे थोड्याशा यशानं हुरळून जातात, मात्र अशा लोकांचं यश फार काळ टिकत नाही, मेहनत शांततेत करा कारण तुम्हाला जेव्हा यश मिळेल तेव्हा ते लोकांना आपोआप दिसणारच आहे, थोड्याशा यशानं हुरळून जाऊ नका, कारण अनेकदा आपण अशा परिस्थितीमध्ये चुकीचे निर्णय घेतो असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. त्यामुळे तुम्हाला जेव्हा थोडं यश मिळतं, तेव्हा आपल्याला अधिक यश कसं मिळेल यासाठी योजना तयार करा असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. तसेच तुम्ही भविष्यकाळासाठी ज्या योजना तयार करणार आहात, त्या नेहमी गुप्त ठेवा असंही चाणक्य यांनी म्हटलं आहे. जाणून घेऊयात चाणक्य याचे ते 5 विचार.
वेळ – चाणक्य म्हणतात कोणत्याही माणसाच्या आयुष्यात वेळ ही अत्यंत महत्त्वाची असते, तुम्ही वेळेला थांबवू शकत नाहीत, मात्र तिचा उपयोग कसा करायचा हे तुमच्या हातात असतं, तुम्ही जेवढा वेळेचा चांगला उपयोग कराल, तेवढे अधिक तुम्ही श्रीमंत व्हाल.
शांती – चाणक्य म्हणतात तुम्ही जर तुमच्या यशाचं मोजमाप फक्त पैशांवरच करणार असाल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधीच शांती मिळणार नाही. यश म्हणजे मनाचं समाधान असतं, त्यामुळे अर्थाजन तर कराच पण मनाच्या शांतीसाठी देवाला शरण जा.
प्रेम – चाणक्य म्हणतात प्रेमाने जग जिंकता येतं. त्यामुळे कोणासाठीही तुमच्या मनात वाईट भावना ठेवू नका, सर्वांचं चांगलंच होईल असा भाव मनात ठेवा, आयुष्यात तुम्हाला कधीही काहीही कमी पडणार नाही.
गुप्त योजना – चाणक्य म्हणतात तुम्हाला जेव्हा एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करायची असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या योजना कोणालाही कधीही सांगू नका, तुम्ही जर तुमच्या योजना इतरांना सांगितल्या तर तुमचे शत्रू तुम्हाला तुमच्या कार्यात कधीच यश येऊ देणार नाहीत, त्यामुळे कधीही जोपर्यंत तुम्हाला यश येत नाही, तोपर्यत आपल्या योजना या गुप्तच ठेवाव्यात असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. शांतपणे कष्ट करत रहा, यश नक्की तुम्हाला मिळेल असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.
जनसंपर्क – चाणक्य म्हणतात जास्तीत जास्त जनसंपर्क वाढवा, त्यामुळे तुम्हाला समाजातील चांगल्या -वाईट लोकांबद्दल माहिती होईल, जे लोक वाईट आहेत, त्यांना तुमच्या आयुष्यात कधीही स्थान देऊ नका, मात्र जे चांगले लोक भेटतील त्यांना आयुष्यभर जपून ठेवा, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)