Chanakya Niti : मुलांना या चार गोष्टी लहानपणीच शिकवा, जबाबदार पालक बना, पहा चाणक्य काय म्हणतात?

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील मार्गदर्शक ठरतात. मुलांचं संगोपन कसं करावं? याबद्दल चाणक्य नेमकं काय म्हणतात? जाणून घेऊयात.

Chanakya Niti : मुलांना या चार गोष्टी लहानपणीच शिकवा, जबाबदार पालक बना, पहा चाणक्य काय म्हणतात?
Chanakya Niti
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 12, 2026 | 10:06 PM

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात तरुण पिढी हे कोणत्याही देशाचं भविष्य असतं. त्यामुळे तरुण पिढी ही नेहमी सुदृढ, बुद्धिवान आणि श्रम प्रतिष्ठेचे संस्कार झालेली असावी, याची सुरुवात मुलांच्या लहानपणीच होत असते. त्यामुळे पालकांवर आपल्या मुलांचं संगोपन करण्याची खूप मोठी जबाबदारी असते, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चाणक्य आपल्या ग्रंथामध्ये म्हणतात ज्या प्रमाणे कुंभार एखाद्या मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्याच्यापासून सुंदर अशा वस्तूंची निर्मिती करतो, बाजारात चिखलाला शून्य किंमत असते, परंतु जेव्हा त्या चिखलाच्या गोळ्यापासून कलाकृती निर्माण होते, त्या वस्तूला बाजारात मूल्य प्राप्त होते. प्रत्येक पालकांची हीच भूमिका आपल्या मुलांच्या आयुष्यात असते, त्यामुळे पालकांची जबाबदारी ही फार मोठी असते, अशा काही गोष्टी असतात, ज्या पालकांनी आपल्या मुलांना त्यांच्या लहानपणीच शिकवल्या पाहिजेत, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

श्रम प्रतिष्ठा – चाणक्य म्हणतात पालकांनी आपल्या मुलांना कष्टाची सवय ही लहानपणापासूनच लावली पाहिजे, कष्टाशिवाय कोणतीही गोष्ट मिळत नाही, हा संस्कार या मुलांवर त्यांच्या लहानपणीच करणं गरजेचं असतं, तसेच कोणतंही काम हे हलकं किंवा भारी नसतं, ही गोष्टी देखील आपल्या मुलांना सांगितली पाहिजे.

शिक्षणाचं महत्त्व – चाणक्य म्हणतात आयुष्यात सर्वात जास्त काही महत्त्वाचं असेल तर ते शिक्षण असतं. त्यामुळे आपल्या मुलांना पालकांनी शिक्षणाचं महत्त्व समजून सांगितलं पाहिजे, तसेच आपल्या मुलांना उत्तम शिक्षण मिळून देण्यासाठी पालकांनी प्रयत्न केले पाहिजेत, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

संस्कार – चाणक्य म्हणतात मुलांवर त्यांच्या लहान वयातच संस्कार केले पाहिजेत, काय योग्य आणि काय अयोग्य यातील फरक त्यांना समजून सांगितला पाहिजे, एक गोष्ट लक्षात ठेवा बांबूंची काठी जोपर्यंत ओली असते, तोपर्यंतच तिला तुम्ही आकार देऊ शकता, एकदा ती वाळली की ती मोडून जाते, तसेच मुलांचं देखील आहे.

थोरा -मोठ्यांचा आदर – चाणक्य म्हणतात आपण आपल्यापेक्षा मोठ्या लोकांचा आदर हा केलाच पाहिजे, आणि हे संस्कार मुलांवर लाहनपणीच केले पाहिजेत.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us