AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता तुकाराम मुंढे करणार चित्रपटाच्या सेटवरील अन्नपदार्थांची तपासणी? FWICE कडून तक्रार

मोठी बातमी समोर येत आहे, 'फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज'कडून मुंबईमध्ये फिल्म, टेलिव्हिजन आणि डिजिटल प्रोजेक्ट्सच्या सेटवर शुटिंगवेळी काम करणारे कर्मचारी, तंत्रज्ञ, तसेच कलाकार यांना देण्यात येणाऱ्या जेवणाच्या गुणवत्तेवर आक्षेप घेण्यात आला आहे.

आता तुकाराम मुंढे करणार चित्रपटाच्या सेटवरील अन्नपदार्थांची तपासणी? FWICE कडून तक्रार
tukaram mundheImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 12, 2026 | 10:02 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज’कडून (FWICE) मुंबईमध्ये फिल्म, टेलिव्हिजन आणि डिजिटल प्रोजेक्ट्सच्या सेटवर शुटिंगवेळी काम करणारे कर्मचारी, तंत्रज्ञ, तसेच कलाकार यांना देण्यात येणाऱ्या जेवणाच्या गुणवत्तेवर आक्षेप घेण्यात आला आहे. ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज’च्या वतीने या संदर्भात अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना एक पत्र लिहून तक्रार करण्यात आली आहे. चित्रिकरणाच्या काळात कलाकारांना जे जेवणं दिलं जातं, त्या जेवणाची तसेच जिथे हे अन्न पदार्थ तयार केले जातात त्या लोकेशनची अचानक तपासणी करण्यात यावी अशी मागणी फेडरेशनच्या वतीने करण्यात आली आहे.

फेडरेशनने दिलेल्या माहितीनुसार मुंबईमध्ये फिल्म, टेलिव्हिजन आणि डिजिटल प्रोजेक्ट्सच्या सेटवर शुटिंगवेळी काम करणारे कर्मचारी, तंत्रज्ञ, तसेच कलाकार यांना देण्यात येणाऱ्या जेवणाच्या गुणवत्तेबाबत अनेकदा तक्रारी केल्या आहेत. या लोकांना शिळं, पोषण तत्त्वाचा अभाव असलेलं तसेच व्यवस्थित न शिजवता, अर्ध कच्च अन्न दिलं जात आहे. तसेच जिथे हे अन्न-पदार्थ बनवले जातात, तो परिसर देखील अस्वच्छ असतो. कलाकार हे चित्रिकरणामध्ये व्यस्त असतात, अशा परिस्थितीमध्ये अशा अन्नामुळे गंभीर आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत.

त्यामुळे आता तुकाराम मुंडे यांनी तातडीने आपल्या तक्रारीची दखल घ्यावी, आणि अचानक छापा टाकून अन्नपदार्थांची तपासणी करावी, तसेच जिथे हे अन्नपदार्थ तयार केले जातात, तिथे देखील भेट द्यावी, अशी मागणी ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज’कडून करण्यात आली आहे, दरम्यान आता या पत्रानंतर तुकाराम मुंडे काय अॅक्शन घेणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचा पदभार स्विकारल्यानंतर राज्यभरात कामाचा धडका लावला आहे, त्यांच्या कामाचं कौतुक होत आहे. त्यांना विविध संस्थाकडून देखील तक्रारी प्राप्त होत आहेत. दरम्यान आता ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज’च्या वतीने  तक्रार करण्यात आली आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?