
आचार्य चाणक्यांच्या मते ज्याप्रमाणे सिंह कधीही हिंसा सोडू शकत नाही, त्याचप्रमाणे दुष्ट मनुष्य कधीही आपल्या दुष्टपणाचा त्याग करू शकत नाही, म्हणून दुष्ट माणसाच्या गोड बोलण्यात अडकण्याची चूक कधीही करू नका. दुष्ट मनुष्य आपली वागणूक कधीही बदलू शकत नाही.

खोटे बोलणारी व्यक्ती एक ना एक दिवस अडचणीत येते कारण एक खोटे लपवण्यासाठी त्याला अनेक खोटे बोलावे लागतात. अशा स्थितीत एके दिवशी तो स्वतःच्याच खोटेपणात अडकतो . यामुळे तो आपली विश्वासार्हताही गमावून बसतो. त्यामुळे कोणत्याही गोष्टीसाठी खोट्याचा आधार घेऊ नका. खोट बोलणारी व्यक्तींना कधीना कधी त्रास होतो.

ज्यांचे शब्द आणि कृती एकमेकांच्या विरुद्ध असतात, असे लोक कधीच विश्वासार्ह नसतात. विश्वासू व्यक्ती आपले विचार कृतीत उतरवतो. त्यामुळे ज्या व्यक्तीचे शब्द त्याच्या कृती सोबत जुळत नाहीत अशा लोकांपासून लांब राहीलेलेच चांगलं.

समजदार माणूस कोणतेही काम कमी लेखात नाही. जिथे लोकांच्या मनात चुकीचे वागण्याची भीती नाही, जिथे माणसाला लाज वाटत नाही.

प्रत्येकाने आपल्या आयुष्यात लक्ष देणेच योग्य असते. तसे न झाल्यास लोक फक्त इतरांच्या आयुष्यात गुंतून राहातात आणि आपला वेळ वाया घालवतात.