
चाणक्या नीतीनुसार, पुरूषांच्या काही सवयी महिलांची कमजोरी ठरतात. ‘यथा चतुर्भिः कनकं परीक्ष्यते, निघृष्णच्छेदनतपद्नैः तथा चतुर्भिः पुरुषः परीक्ष्यते, श्रुतेन शीलेन गुणेन कर्मणा।’ या एका श्लोकात चाणक्याने पुरूषांच्या त्या सवयींचा उल्लेख केला आहे. या सवयींमुळे पुरूष महिलांच्या दृष्टीने त्यांचे रिअल हिरो ठरतात. कोणत्या आहेत त्या सवयी? कशा ठरतात खास?
इमानदारी : आता ही एक कठीण अट असते. पुरूष इमानदारीत कमजोर असतात, असे म्हटल्या जाते. जर एखादा पुरूष नात्यात इमानदार नसेल तर महिला नाराज होतात. पण जे पुरूष प्रामाणिक राहतात, त्यांच्यावर महिला फिदा होतात. पुरुषांवर शंका घेणे, त्यांच्यावर शक घेणे यात महिला तरबेज असतात. त्यांना सहजा सहजी पुरुषाला मोकळे सोडायचे नसते. जर पुरूष इमानदार नसेल तर महिला अशा पुरूषाचा आदर करत नाही.
चांगली वागणूक : चाणक्य नीतीनुसार, महिला पुरूषांकडून चांगल्या वागणुकीची अपेक्षा करतात. जर पुरूष दुसर्या स्त्रीसोबत चांगला व्यवहार करत असेल तर महिलेला ही बाब रूचत नाही. त्यांच्यात त्यावरून वाद होऊ शकते. नात्यात दुरावा येऊ शकतो. पुरूष भांडकुदळ, किरकिरा, टोमणे मारणारा असेल तर महिला या स्वभावाला कंटाळतात. आपल्या माणसानं आपुलकीने दोन शब्द बोलावे इतकीच तिची अपेक्षा असते.
चांगला श्रोता : महिला अनेक विषयांवर मत व्यक्त करतात. त्यांना रोजच्या जीवनातील बारीक-सारीक गोष्टी सांगण्यात स्वारस्य असते. महिला त्या पुरुषांवर फिदा असतात जो चांगला श्रोता असतो. जो पुरूष गर्विष्ठ असतो आणि तो चुकीवर सहज माफी मागतो, असे पुरूष सुद्धा त्यांना आवडतात. त्यामुळे महिलेच्या चांगल्या गोष्टी ऐका आणि त्याचे अधुनमधून कौतुक सुद्धा करा.
आत्मसन्मान महत्त्वाचा : नाते कोणतेही असो, जो महिलांचा आत्मसन्मान करतो, असा पुरूष महिलांना आवडतो. त्या त्याची स्तुती करतात. जर एखाद्याने महिलेच्या आत्मसन्मानाला धक्का लावला तर असे नाते फार काळ टिकत नाही. महिलांना त्यांचा आत्मसन्मान महत्त्वाचा असतो. आवडता पुरूष जर तिला दुखावत असेल तर तिला ते सहन होत नाही.
डिस्क्लेमर : इंटरनेटवर उपलब्ध स्त्रोतावरून ही माहिती देण्यात आली आहे. टीव्ही ९ याविषयीची कोणताही दुजोरा देत नाही. दावा करत नाही.