Chanakya Niti : हे चार लोकं तुमचं वैवाहिक जीवन उद्ध्वस्त करतात, यांच्यापासून जर जपूनच…

आर्य चाणक्य हे एक मोठे विचारवंत होते, त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, आपल्या या ग्रंथामध्ये त्यांनी नातेसंबंध कसे असावेत आणि कसे असू नयेत? याबद्दल अनके गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात आपल्या आयुष्यात असे काही लोक येतात जे तुमचा संसार उद्ध्वस्त करू शकतात. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

Chanakya Niti : हे चार लोकं तुमचं वैवाहिक जीवन उद्ध्वस्त करतात, यांच्यापासून जर जपूनच...
Chanakya
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 19, 2026 | 9:20 PM

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये मानवी जीवनामधील नातेसंबंध कसे असावेत आणि कसे असू नयेत याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. तसेच पती पत्नीचं नातं कसं असावं? पत्नीची कर्तव्य काय आहेत? पतीची कर्तव्य काय आहेत? याबद्दल देखील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात पती-पत्नीचं नातं हे विश्वासावर आधारलेलं असतं. जेव्हा या विश्वासाला तडा जातो तेव्हा विवाह संस्थेचा पाया कमकुवत होतो आणि त्यामुळे संसार नावाचा वटवृक्ष कोसळतो. त्यामुळे कधीही विश्वासाला तडा जाऊ देऊ नका. पती आणि पत्नी दोघांनाही एकमेकांबद्दल आदर हवा, तरच तुमचा संसार दीर्घकाळ टिकतो. परंतु या जगात असे काही लोक असतात जे लोक तुमच्या वाईटावरच टपलेले असतात. असे लोक संधी मिळताच तुमचं वैवाहिक जीवन उद्ध्वस्त करतात, त्यामुळे असे लोक तुम्हाला वेळीच ओळखता आले पाहिजेत. अशा लोकांपासून तुम्ही सावध असलं पाहिजे, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

विश्वासघातकी जोडीदार – चाणक्य म्हणतात तुम्ही पुरुष असाल किंवा महिला, जर तुम्ही तुमच्या जोडीदारा प्रति प्रामाणिक नसाल तुम्ही त्याचा विश्वासघात करत असाल किंवा तुमचा जोडीदार तुमचा विश्वासघात करत असेल तर असे नाते फार काळ टिकत नाही, तुम्ही स्वत: तुमचं नातं तुमच्या हाताने संपुष्टात आणतात. अशा व्यक्तींचा संसार हा फार काळ टीकू शकत नाही. घरात सातत्याने वाद होतात, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

कपटी मित्र – चाणक्य म्हणतात कपटी मित्रांपासून तुम्ही नेहमी सावध राहिलं पाहिजे, असे लोक कधीही कोणाचे नसतात. मुळात त्यांच्या मनात कपटच असल्यामुळे असे लोक जरी तुमचे मित्र असले तरी देखील ते तमचं सुख पाहू शकत नाहीत. असे लोक सातत्याने तुमच्या संसारामध्ये विष कालवण्याचा प्रयत्न करू शकतात, त्यामुळे तुम्हाला असे लोक वेळीच ओळखता आले पाहिजेत, तसेच या लोकांपासून सावध राहिलं पाहिजे असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

चुकीचा मित्र – चाणक्य म्हणतात अनेकदा आपण चुकीच्या लोकांसोबत मैत्री करतो, असे लोक आपल्याला ओळखता आले पाहिजेत. कारण हे लोक कलांतराने तुमच्यासाठी डोकेदुखी ठरू शकतात, त्यांच्यामुळे तुमचा संसार धोक्यात येऊ शकतो.

व्यसनी मित्र – चाणक्य म्हणतात आयुष्यात माणसाला कधीही व्यसनी मित्र नसावेत, कारण माणूस वाईट गोष्टी लगेच शिकतो. तुम्हाला जर एखाद्या गोष्टीचं व्यसन लागलं तर तुमचा संसार धोक्यात येऊ शकतो, त्यामुळे अशा लोकांची संगत नेहमी टाळावी.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 

Follow Us