
आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक समस्यांना तोंड दिले. याच संकटातून शिकत त्यांनी चाणक्यानीतीचे लेखन केले. यामध्ये त्यांनी लोकांच्या आयुष्याला दिशा देणाऱ्या गोष्टी लिहल्या. यामध्ये त्यांनी जर तुम्हाला आयुष्यात यश हवं असेल तर तुम्हाला खालील गोष्टी करणं गरजेचं असते असं सांगितलं.

आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. तारुण्यात जर एखादी व्यक्ती आळशीपणाच्या सवयीचा बळी ठरली तर तो स्वतःच आपले आयुष्य उद्ध्वस्त करतो. त्याला सर्व संधी मिळाल्या तरी आळशीपणामुळे तो त्या गमावतो. त्यामुळे आळस पूर्णपणे सोडून द्यावा.

बेफिकीर वृत्ती तुमच्या सर्व मेहनतीचा नाश करू शकते. त्यामुळे तारुण्यात तुमची उर्जा योग्य दिशेने घेऊन कोणतेही काम काळजीपूर्वक करा. तुम्हाला काही शंका असल्यास, अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या. पण बेसावधपण कोणतेही काम करु नका यामुळे त्रास तुम्हालाच होईल.

वाईट संगत तुमची प्रतिमा आणि तुमचे आयुष्य खराब करू शकते. त्यामुळे खूप विचारपूर्वक मित्र बनवा. एक चांगला मित्र तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊ शकतो, परंतु वाईट संगत तुमच्या आयुष्याचा काटा बनवू शकते. जर तुमचा मित्र वाईट सवयींच्या आहारी गेला असेल तर तुम्हाला ती सवय लागण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही.

नशा कोणतीही असो, तरुणाईच कोणाचेही आयुष्य खराब करू शकते. व्यसनामुळे व्यक्तीला शारीरिक, मानसिक आणि आर्थिक तिन्ही प्रकारे नष्ट होते आणि ती व्यक्ती अयोग्य राहते.

तरुणपणात कामवासनेची सवय लागली तरी त्याचाही वाईट परिणाम व्यक्तीच्या जीवनावर होतो. त्यामुळे व्यक्तीची प्रतिष्ठा पणाला लागते आणि तो लोकांसाठी अविश्वासू बनतो. ती गोष्ट मिळवण्यासाठी तुम्ही कोणत्याही थराला जावू शकता.