Chanakya Niti : या दोन गोष्टी असतात मानसाच्या दु:खाचं मुळ कारण, प्रत्येक पाऊल जपून टाका

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये त्यांनी मानवी दु:खाचं मुळ सांगितलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

Chanakya Niti : या दोन गोष्टी असतात मानसाच्या दु:खाचं मुळ कारण, प्रत्येक पाऊल जपून टाका
Chanakya Niti
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 22, 2026 | 7:27 PM

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील अनेकांना जगण्याची प्रेरणा देतात. जीवन कसं जगावं? याचा एक सुस्पष्ट असा दृष्टीकोन देतात. चाणक्य म्हणतात माणसाच्या आयुष्याच चढ उतार सुरूच असतात. सावली मागून ऊन उन्हा मागून सावली हा खेळ आयुष्यभर सुरूच राहतो. माणूस आपल्या वाईट वेळेत दु:खी होतो. तर जेव्हा त्याची परिस्थिती चांगली असते, तेव्हा आनंदी असतो. परंतु जेव्हा तुमच्यावर वाईट वेळ येते तेव्हा कधीही खचून जाऊ नका, असा सल्ला चाणक्य देतात. चाणक्य म्हणतात आलेली प्रत्येक वेळ ही काही थांबत नसते, ती आज ना उद्या निघून जाणार असते. त्यामुळे तुम्ही तुमच्या वाईट काळात संयम ठेवणं महत्त्वाचं असतं.

ज्या माणसाकडे संयम आहे, असा माणूस जग जिंकतो. त्यामुळे वेळ कोणतीही असो, चांगली अथवा वाईट संयम हा गरजेचा असतो. माणसाला दु:ख का होतं? तर त्याची विविध कारणं असू शकतात. परंतु मुळ फक्त दोनच कारणं आहेत, असं चाणक्य आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये सांगतात. चला तर मग जाणून घेऊयात ही दोन कारणं नेमकी कोणती आहेत, आणि चाणक्य यांनी या दोन कारणांनाच मानवी दु:खाचं मुळ का म्हटलं आहे? त्याबद्दल.

Loading...

मूर्खपणा – चाणक्य म्हणतात माणूस जर मूर्ख असेल तर त्यापेक्षा मोठं दु:ख या जगात कोणतंही असू शकत नाही. तुम्ही अज्ञानी असणं हेच या जगातील सर्व दु:खाचं मुळ कारण आहे. कारण तुम्ही जेव्हा मूर्ख असतात, तेव्हा हा समाज तुमची फसवणूक करतो. तो तुम्हाला कधीही शांत जगवू देणार नाही. तुम्ही जर अडाणी असाल तर तुमची आयुष्यात कधीही प्रगती होऊ शकत नाही, त्यामुळे प्रत्येक माणसाने शिक्षण हे घेतलंच पाहिजे, असं चाणक्य म्हणतात.

संयमाचा अभाव – चाणक्य म्हणतात जर तुमच्याकडे संयम नसेल तर तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीच कोणती गोष्ट करू शकत नाहीत.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us