AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : तुम्ही चुकीच्या मार्गाने तर चालला नाहीत ना? चाणक्यांनी सांगितली यशाची त्रीसूत्री

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळातही आपल्याला मार्गदर्शक ठरतात. चाणक्य म्हणतात जर तुम्हाला आयुष्यात यश मिळवायचं असेल तुम्ही तुमच्या आयुष्यात काही बदल हे जाणीवपूर्वक घडवून आणले पाहिजेत.

Chanakya Niti : तुम्ही चुकीच्या मार्गाने तर चालला नाहीत ना? चाणक्यांनी सांगितली यशाची त्रीसूत्री
chankya Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 16, 2026 | 8:59 PM
Share

आर्य चाणक्य हे एक मोठे विचारवंत होते, त्यांना त्यांच्या आयुष्यात जे काही अनुभव आले, त्या अनुभवावरून त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ आजही अनेकांना जगण्याची प्रेरणा देतो, आयुष्य कसं जगावं आणि जीवनात यशस्वी कसं व्हावं याबद्दल मार्गदर्शन करतो. आर्य चाणक्य म्हणतात ज्या लोकांनी आपल्या आयुष्यात यश मिळवलेलं असतं, ते यश त्यांना असंच मिळालेलं नसतं. त्यासाठी त्यांनी प्रचंड कष्ट केलेले असतात. परंतु आपल्याला त्यांचे कष्ट कधीच दिसत नाहीत, दिसतं ते फक्त त्यांचं यश. चाणक्य पुढे असंही म्हणतात की अनेकदा आपण आपल्या आयुष्यात एखादं ध्येय निश्चित करतो आणि ते प्राप्त करण्यासाठी दिवसरात्र कष्ट करतो. मात्र हे सर्व करत असताना जर तुमचा मार्ग चुकला तुमची दिशा चुकली तर मग तुम्ही कितीही कष्ट केले तरी देखील तुम्हाला यश मिळणार नाही. जर तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही बदल हे जाणीवपूर्वक घडवून आणावे लागतील तर आणि तरच तुम्ही यशस्वी व्हाल, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

शॉर्टकट – चाणक्य म्हणतात जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात एखादं उदिष्ट निश्चित करता, तेव्हा ते प्राप्त करण्यासाठी तुम्हाला प्रचंड कष्ट करण्याची गरज असते. परंतु अनेकदा तुमच्या आयुष्यात असा प्रसंग येतो की, तुम्हाला तुमचं उदिष्ट पूर्ण करण्यासाठी अनेक शॉर्टकट दिसू लागतात, आणि तिथेच तुमची फसगत होते. तुम्ही उदिष्ट लवकर पूर्ण व्हावं यासाठी शॉर्टकट मार्ग निवडतात आणि तुमच्या पदरी अपयश पडतं, तुम्ही निराश होतात. त्यामुळे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा चुकीच्या मार्गाने जाऊ नका, यशाला कोणताही शॉर्टकट नसतो, जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात यशस्वी व्यक्ती व्हायचं असेल तर कष्ट हे केलेच पाहिजे असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

मोठ्यांचा अनुभव – चाणक्य म्हणतात आपल्याला आपल्या मार्गात अनेकदा असे लोक भेटतात ज्यांचा त्या क्षेत्रातील अनुभव हा प्रचंड असतो, ते आपल्यापेक्षा वयाने मोठे असतात. जेव्हा ते लोक तुम्हाला काही सल्ला देतात, तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करू नका, त्यांचा अपमान देखील करू नका. त्यांचा सल्ला तुम्हाला तुमचं लक्ष्य गाठण्यासाठी मोलाचा ठरू शकतो, कारण त्यांना त्या क्षेत्रातील प्रचंड अनुभव असतो.

अद्यावत ज्ञान – चाणक्य म्हणतात फक्त कष्ट करूनच चालत नाही, तर तुम्हाला एखाद्या क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल तर त्या क्षेत्रात काय बदल होत आहेत? ही गोष्ट देखील लक्षात घेतली पाहिजे, तसेच त्या क्षेत्रातील अद्यावत ज्ञान मिळवण्याचा देखील प्रयत्न केला पाहिजे, तरच तुम्ही तुमच्या आयुष्यात यशस्वी होऊ शकतात.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...