AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील जुन्या वाहनांना E10 पेट्रोल मिळणार? मोदी सरकारकडून विचार सुरू

भारतातील जुन्या वाहनांना E10 पेट्रोलही मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत मोदी सरकारकडून विचार सुरू आहे.

भारतातील जुन्या वाहनांना E10 पेट्रोल मिळणार? मोदी सरकारकडून विचार सुरू
petrol Image Credit source: tv9
| Updated on: Aug 20, 2026 | 7:53 AM
Share

दिल्ली इथेनॉल मिश्रीत नसलेल्या पेट्रोलची किमंत 167.35 रुपये इतकी झाली आहे. E5 पेट्रोलची किंमत 109.24 रुपये आणि E20 पेट्रोलची किंमत 102.12 रुपये इतकी असणार आहे. तर E10 पेट्रोलची भाव पेट्रोल भाव किती असणार, याबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. यासोबत जुन्या वाहनधारकांना E10 पेट्रोल देण्याचा विचार मोदी सरकार करत आहे.

देशभरात E20 पेट्रोलमुळे वाहनाच्या मायलेजवर परिणाम आणि इंजिन खराब होत असल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. दुसरीकडे भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही. अनंत नागेश्वरन यांनी केलेल्या एका सूचनेने या चर्चेला नवं वळण लागलं आहे. एका लेखात नागेश्वरन यांनी म्हटलं की, जुन्या वाहनांसाठी पेट्रोल पंपावर E10 इंधनाचा पर्याय सुरू करणे आणि नव्या वाहनांना E20 इंधन सुरू करण्याची सूचना त्यांनी केली आहे.

E10 मध्ये 90 टक्के पेट्रोल असते, तर 10 टक्के इथेनॉल असते. तर E20 मध्ये 80 टक्के पेट्रोल आणि 20 टक्के इथेनॉल असेल. 2025-26 आर्थिक वर्षाच्या सरकारी आकडेवारीनुसार, कच्च्या मालावर अवलंबून इथेनॉलची किंमत अंदाजे 58 रुपये तर 71,86 रुपये प्रति लीटर आहे. ट्रान्सपोटेशन, जीएसटी जोडल्याने इथेनॉलची खरेदी वाढते. त्यात दिल्लीत पेट्रोलची आधारभूत किंमत ही 81.12 रुपये इतकी आहे. दिल्लीत व्हॅटशिवाय एक लीटर पेट्रोलची किंमत ही 81.12 आहे. प्रति लीटरमध्ये डीलर कमिशन 4.41 रुपये इतके आहे. तर व्हॅट हे 16.59 व्हॅट जोडल्यानंतर पेट्रोल पंपावर प्रति लिटर 102.12 रुपये इतकी होते.

इथेनॉल मिश्रीत नसलेले पेट्रोल आणि E20 पेट्रोलच्या किंमतीत 65 रुपयांचा फरक आहे. E20 ची जागा E10 ने घेतली. तर पेट्रोलमध्ये 10 टक्के इथनोल मिश्रीत केले जाईल.त्यामुळे E10 पेट्रोल प्रति लिटर 103 रुपये ते 105 रुपये इतके असू शकते. त्यात E10 आणताना अडचणींचाही सामना करावा लागतो. E10 आणि E20 हे दोन्ही प्रकारचे पेट्रोल उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र साठवण, वाहतूक आणि वितरण व्यवस्थेची गरज भासते.  दरम्यान, इंडियन ऑइलच्या माहितीनुसार, XP100 हे दिल्ली, गुरुग्राम, नोएडा, जयपूर, चंदीडगड, मुंबई, पुणे, चेन्नई, बेंगळुरू , अहमदाबाद, भुवनेश्वर, कोलकाता या निवडक शहरांतील पेट्रोल पंपावर उपलब्ध आहे.

Follow Us
शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटोही फाडला, ठाकरेंची शिवसेना आक्रमक..
Shivsena : शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटोही फाडला, ठाकरेंची शिवसेना आक्रमक; पुस्तकात नेमकं काय लिहिलंय?
चार तास वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली; दीड वर्षांच्या मुलाचं जीवन
Raigad : चार तास वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली; दीड वर्षांच्या मुलाचं जीवन संपलं, रायगडमधील घटनेने हळहळ
फायनान्स कंपन्यांची खुलेआम गुंडागर्दी; 22 हजारांचा हफ्ता चुकला अन्....
Latur : फायनान्स कंपन्यांची खुलेआम गुंडागर्दी; 22 हजारांचा हफ्ता चुकला, वसुलीसाठी शेतकऱ्याला शिवीगाळ
सातारा जिल्हा बँकेत भाजपला बाजूला सारत राष्ट्रवादी-शिंदेसेनेची सत्ता!
Satara Bank Election : सातारा जिल्हा बँकेत भाजपला बाजूला सारत राष्ट्रवादी-शिंदेसेनेची सत्ता!
मन शांत ठेवलं की मार्ग निघतो... बाळासाहेबांच्या एका शिकवणीचा उद्धव....
Uddhav Thackeray : मन शांत ठेवलं की मार्ग निघतो... बाळासाहेबांच्या एका शिकवणीचा उद्धव ठाकरेंनी केला उल्लेख; नेमकं काय म्हणाले?
सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेत नवं समीकरण; काँग्रेसचे महेंद्र लाड....
Sangli Bank : सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेत नवं समीकरण; काँग्रेसचे महेंद्र लाड अध्यक्ष तर, तानाजी पाटील उपाध्यक्ष
मेळघाटच्या जंगलावर कुऱ्हाड पडणार? चिखलदर्‍यात 1500 मेगावॅटचा जलविद्युत
Melghat : मेळघाटच्या जंगलावर कुऱ्हाड पडणार? चिखलदर्‍यात 1500 मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प; 240 हेक्टर वनक्षेत्रावर संकट
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; लोणार सरोवराला जागतिक भूगर्भीय..
Lonar Lake : महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; लोणार सरोवराला जागतिक भूगर्भीय वारसा स्थळाचा दर्जा
सोनं एका दिवसात एवढ्या रुपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले....
Gold Silver Price Today : सोनं एका दिवसात एवढ्या रुपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले; जळगावच्या सराफ बाजारात मोठा दिलासा, पाहा आजचे भाव
शायना एनसी विधानभवनात दाखल; एकनाथ शिंदेंनी भेटीसाठी बोलावल्याची माहिती
Shaina NC : शायना एनसी विधानभवनात दाखल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेटीसाठी बोलावल्याची माहिती, राजकीय चर्चांना उधाण