AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Airplane Facts : मेकअप करून आम्हाला 12 तास…एअर होस्टेसने समोर आणलं अचंबित करणारं सत्य, तुम्हालाही धक्का बसेल!

संगिता सेन नावाची एक एअर होस्टेस आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केलाय. या पोस्टमध्ये संगिता सेनने एअर होस्टेसच्या आयुष्यात काय असतं, याची हकिकत सांगितली आहे.

Airplane Facts : मेकअप करून आम्हाला 12 तास...एअर होस्टेसने समोर आणलं अचंबित करणारं सत्य, तुम्हालाही धक्का बसेल!
air hostess makeupImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 18, 2026 | 9:41 PM
Share

Air Hostess Problems : विमानातून प्रवास करायचा असेल तर विमानत प्रवेश करताना तुमच्या स्वागतासाठी एअर होस्टेस उभी असते. संपूर्ण विमान प्रवासात एअर होस्टेस तुमची मदत करत असते. तुम्हाला प्रवासादरम्यान कोणतीही अडचण येऊ नये याची जबाबदारी ही एअर होस्टेसवर असते. विशेष म्हणजे एअर होस्टेस व्हायचं असेल तर त्यासाठी परीक्षा द्याव्या लागतात. योग्य प्रशिक्षण घेतल्यानंतरच एअर होस्टेस म्हणून नोकरी करण्याची परवानगी दिली जाते. परंतु याच जॉबची चिंताजनक आणि चकित करणारी माहिती खुद्द एका एअर होस्टेसनेच दिली आहे.

मेकअपमुळे किती होतो त्रास?

संगिता सेन नावाची एक एअर होस्टेस आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केलाय. या पोस्टमध्ये संगिता सेनने एअर होस्टेसच्या आयुष्यात काय असतं, याची हकिकत सांगितली आहे. चेहरा सुंदर दिसावा म्हणून एअर होस्टेसला नेहमीच मेकअप करावा लागतो. सुंदर मेकअप करून प्रवाशांचे स्वागत करावे लागते. परंतु या मेकअपमुळे त्यांना किती त्रास होतो, याची माहिती तिने या व्हिडीओत दिली आहे.

फाऊंडेशन लावून, आयलायनर लावून…

मेकअप केल्यानंतर काय त्रास होतो, हे सांगताना संगिता सेन म्हणाली की, तुम्ही माझा हा जो मेकअप पाहताय तो कंपनीच्या स्टँडर्डनुसार आहे. फाऊंडेशन लावून, आयलायनर लावून आम्हाला पूर्ण मेकअपमध्येच जावं लागेल. आम्हाला कोणी पाहतंय की नाही, कोणी आमच्या सौंदर्याची स्तुती करतंय की नाही याचा आम्हाला फरक पडत नाही. परंतु कंपनीच्या नियमानुसार आम्हाला मेकअप करावा लागतो.

एअर होस्टेसचा मेकअप करणे एवढे सोपे नाही

पुढे बोलताना, प्रत्येक 12 तासांनी आम्हाला हा मेकअप करावा लागतो. तुम्हाला मनातील गोष्ट सांगते की मी या मेकअपला कंटाळून गेलेय. हा मेकअप करून करून चेहऱ्यावरील त्वचा पूर्णपणे घासून निघते, अशी माहिती संगिताने दिलीय. तसेच, मी जेव्हा पार्टी, मिटिंग किंवा एखाद्या कार्यक्रमाला जाते तेव्हा मी मेकअप करून जात नाही. कारण चेहऱ्यावरील त्वचेला आराम मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे एअर होस्टेसचा मेकअप करणे एवढे सोपे नाही. परंतु ते करावे लागते, अशा शब्दांत एअर होस्टेसने मन मोकळं केलंय.

Follow Us
शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटोही फाडला, ठाकरेंची शिवसेना आक्रमक..
Shivsena : शायना एनसी यांनी बाळासाहेबांचा फोटोही फाडला, ठाकरेंची शिवसेना आक्रमक; पुस्तकात नेमकं काय लिहिलंय?
चार तास वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली; दीड वर्षांच्या मुलाचं जीवन
Raigad : चार तास वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली; दीड वर्षांच्या मुलाचं जीवन संपलं, रायगडमधील घटनेने हळहळ
फायनान्स कंपन्यांची खुलेआम गुंडागर्दी; 22 हजारांचा हफ्ता चुकला अन्....
Latur : फायनान्स कंपन्यांची खुलेआम गुंडागर्दी; 22 हजारांचा हफ्ता चुकला, वसुलीसाठी शेतकऱ्याला शिवीगाळ
सातारा जिल्हा बँकेत भाजपला बाजूला सारत राष्ट्रवादी-शिंदेसेनेची सत्ता!
Satara Bank Election : सातारा जिल्हा बँकेत भाजपला बाजूला सारत राष्ट्रवादी-शिंदेसेनेची सत्ता!
मन शांत ठेवलं की मार्ग निघतो... बाळासाहेबांच्या एका शिकवणीचा उद्धव....
Uddhav Thackeray : मन शांत ठेवलं की मार्ग निघतो... बाळासाहेबांच्या एका शिकवणीचा उद्धव ठाकरेंनी केला उल्लेख; नेमकं काय म्हणाले?
सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेत नवं समीकरण; काँग्रेसचे महेंद्र लाड....
Sangli Bank : सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेत नवं समीकरण; काँग्रेसचे महेंद्र लाड अध्यक्ष तर, तानाजी पाटील उपाध्यक्ष
मेळघाटच्या जंगलावर कुऱ्हाड पडणार? चिखलदर्‍यात 1500 मेगावॅटचा जलविद्युत
Melghat : मेळघाटच्या जंगलावर कुऱ्हाड पडणार? चिखलदर्‍यात 1500 मेगावॅटचा जलविद्युत प्रकल्प; 240 हेक्टर वनक्षेत्रावर संकट
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; लोणार सरोवराला जागतिक भूगर्भीय..
Lonar Lake : महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; लोणार सरोवराला जागतिक भूगर्भीय वारसा स्थळाचा दर्जा
सोनं एका दिवसात एवढ्या रुपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले....
Gold Silver Price Today : सोनं एका दिवसात एवढ्या रुपयांनी स्वस्त, चांदीचे दरही घसरले; जळगावच्या सराफ बाजारात मोठा दिलासा, पाहा आजचे भाव
शायना एनसी विधानभवनात दाखल; एकनाथ शिंदेंनी भेटीसाठी बोलावल्याची माहिती
Shaina NC : शायना एनसी विधानभवनात दाखल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेटीसाठी बोलावल्याची माहिती, राजकीय चर्चांना उधाण