तळीरांमांसाठी मोठी बातमी; दारूची दुकानं 24 तास सुरू ठेवण्यास परवानगी, आता या ठिकाणी मिळणार कधीही दारू
भारतामध्ये मद्यप्रेमी लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मद्यपींसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे आता दारूची दुकानं 24 तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

भारतामध्ये मद्यप्रेमी लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मद्यपींसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे आता दारूची दुकानं 24 तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणजेच काय तर आता मद्यपी लोकांना 24 तास दारू मिळणार आहे. गोवा सरकारने हा निर्णय घेतला आहे. गोवा राज्यात आता तळीरांमांना 24 तास दारू मिळणार आहे. गोवा हे देशातील सर्वात मोठं पर्यटन केंद्र आहे. दरवर्षी लाखो लोक गोव्याला भेट देत असतात. यामध्ये मद्यपींची संख्या देखील मोठी असते, ज्यावेळी पर्यटनाचा हंगाम नसतो, तेव्हा देखील गोव्यात पर्यटकांची गर्दी असतेच. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आता गोवा सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे आता गोव्यात दारूच्या दुकांसह शॉपिंग मॉल देखील 24 तास सुरू राहणार आहेत.
गोवा सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. गोवा सरकारने तेथील शॉपिंग मॉलला 24 तास दुकानं सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. याचाच अर्थ तुम्ही आता गोव्यात कधीही गेलात अगदी मध्यरात्री तरी देखील तुम्हाला तिथे मनसोक्त खरेदी करता येणार आहे. कारण आता सरकारच्या नव्या नियमानुसार तेथील शॉपिंग मॉल 24 तास सुरू राहणार आहेत. सरकारने आपला हा नवा निर्णय तात्काळ प्रभावाने लागू केला आहे.
दारूची दुकानंही सुरू राहणार
दरम्यान मॉलसोबतच सरकारने दारूच्या दुकांना देखील 24 तास सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. मात्र त्याचसोबत काही नियम आणि अटी देखील घालण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये एअरपोर्ट परिसरात जे दारूचे रिटेल विक्रेते आहेत, अशा दुकांना 24 तास सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. यासोबतच जे मोठे हॉटेल आहेत, आणि ज्यांच्याकडे दारू विक्रीचा अधिकृत परवाना आहे, अशा हॉटेल्सला देखील 24 तास दारू विक्रीची परवानगी देण्यात आली आहे. यासोबतच जी दारूची दुकानं ही पर्यटनस्थळी आहेत, अशा दुकांना देखील 24 तास दुकानं सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतु या व्यतिरिक्त जे सामान्य रिटेल विक्रेते आहेत, त्यांना मात्र 24 तास दारूची दुकानं सुरू ठेवता येणार नाहीयेत.
