Chanakya Niti : खरा श्रीमंत कोण? पहा चाणक्य काय म्हणतात?

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी जे विचार मांडले आहेत, ते आजही अनेकांना प्रेरणा देतात.

Chanakya Niti : खरा श्रीमंत कोण? पहा चाणक्य काय म्हणतात?
Chanakya
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 10, 2026 | 10:04 PM

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत होते, अर्थतज्ज्ञ होते तसेच ते एक कुटनीती तज्ज्ञ देखील होते. चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. चाणक्य यांनी आपल्या या ग्रंथामध्ये असे अनेक विचार मांडले जे आजच्या काळात देखील तेवढेच उपयोगाचे सिद्ध होतात. चाणक्य यांचे हे विचार अनेकांना आपलं आयुष्य जगताना मार्गदर्शन ठरतात, चाणक्य म्हणतात खरा श्रीमंत तो नाही, ज्याकडे पैसा आहे. जर तुमच्याकडे भरपूर पैसा असेल आणि तुमच्या मनाला जर समाधान नसेल तर अशा पैशांचा काहीही उपयोग नाही. खरा श्रीमंत तो आहे, ज्याचं मन समाधानी आहे, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे, त्याबद्दल?

संतती – चाणक्य म्हणतात तुमच्याकडे खूप पैसे आहेत, परंतु तुम्हाला संतती नाही. किंवा संतती आहे,  मात्र ती दुर्गणी असेल तर तुमच्याकडे पैसा असून देखील काहीही उपयोग नाही, परंतु तुमच्याकडे थोडा पैसा असेल तर पण तुमची संतती ही गुणवाण निघाली तर तुम्ही या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहात असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

आरोग्य- चाणक्य म्हणतात ज्या माणसाकडे उत्तम आरोग्य असतं, तो या जगातील सर्वात श्रीमंत माणूस असतो, तुमच्याकडे खूप पैसा असेल आणि जर तुमचं आरोग्य तुम्हाला साथ देत नसेल तर त्या पैशाचा तुम्हाला काहीही उपयोग नाही. परंतु जर तुमचं आरोग्य उत्तम असेल तर तुम्ही जगातील सर्वात श्रीमंत माणूस आहात असं चाणक्य यांनी म्हटलं आहे.

समाधान – चाणक्य म्हणतात एखाद्या माणसाकडे प्रचंड पैसा असतो, परंतु तो माणूस मनातून समाधानी नसतो, असा माणूस कायम अस्वस्थ असतो. परंतु एखाद्या माणसाकडे फार पैसा नसतो , मात्र तो समाधानी असतो, अशा माणसालाच खरा श्रीमंत माणूस म्हणावे, असं चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये सांगितलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us