AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देणगी मिळवण्यात प्रादेशिक पक्ष सुस्साट, भाजपा, काँग्रेसलाही टाकलं मागे; आकडेवारी पाहून चकितच व्हाल!

तमिळनाडूतील DMK ला सर्वाधिक 365.78 कोटी रुपयांचा निधी मिळाला. त्यापैकी मोठा हिस्सा देणगीदारांची पूर्ण माहिती नसलेल्या रकमेतून आल्याचे ADR ने नमूद केले आहे.

देणगी मिळवण्यात प्रादेशिक पक्ष सुस्साट, भाजपा, काँग्रेसलाही टाकलं मागे; आकडेवारी पाहून चकितच व्हाल!
party donation dataImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 10, 2026 | 9:44 PM
Share

Regional Party Funds : देशातील राजकीय पक्षांना मिळणारी देणगी हा विषय कायम चर्चेत असणारा विषय आहे. काही संस्थांनी देशातील प्रमुख राजकीय पक्षांना कोट्यवधी रुपयांची देणगी दिलेली आहे. काही कंपन्यांनी दिलेला निधी तर थक्क करणार आहे. दरम्यान, देणगीच्या बाबतीत फक्त राष्ट्रीय पक्षच नव्हे तर राज्य पातळीवरील पक्षही देणगी मिळवण्यात पुढे आहेत. देशातील आठ राजकीय पक्षांनी भाजपा, काँग्रेस तसेच इतर राष्ट्रीय पक्षांनाही मागे टाकलं आहे.

नेमकी काय माहिती समोर आली?

देशाच्या राजकारणात आर्थिक ताकद केवळ भाजप आणि काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षांपुरती मर्यादित राहिलेली नाही. प्रादेशिक पक्षांच्या तिजोरीतही मोठ्या प्रमाणात निधी जमा होत असल्याचे समोर आले आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या (ADR) अहवालात तसे सांगण्यात आलेले आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये देशातील प्रमुख प्रादेशिक पक्षांना मिळालेल्या देणग्यांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल 198 टक्क्यांची वाढ झाली आहे.

प्रादेशिक पक्षांना किती देणगी मिळाली?

ADR ने 6 ऑगस्ट रोजी एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार, 2023-24 मध्ये प्रादेशिक पक्षांना 20 हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या स्वरूपात एकूण 347.69 कोटी रुपये देणगी मिळाली होती. 2024-25 मध्ये ही रक्कम तब्बल 1,051.56 कोटी रुपयांवर पोहोचली. देणगीदारांची संख्याही 2,861 वरून वाढून 5,297 झाली आहे.

एकूण निधीपैकी जवळपास 80 टक्के हिस्सा….

भाजप आणि काँग्रेस वगळता इतर राष्ट्रीय पक्षांच्या तुलनेत आठ प्रमुख प्रादेशिक पक्षांनी अधिक निधी उभारला आहे. DMK, तृणमूल काँग्रेस (AITC), YSRCP, TDP आणि AIADMK या पाच पक्षांनाच एकूण 840.12 कोटी रुपये मिळाले. हा प्रादेशिक पक्षांना मिळालेल्या एकूण निधीपैकी जवळपास 80 टक्के हिस्सा आहे. प्रादेशिक पक्षांनी आम आदमी पार्टी (AAP), बहुजन समाज पार्टी (BSP), कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया-मार्क्सवादी (CPI-M) आणि नॅशनल पीपल्स पार्टी (NPP) अशा पक्षांना प्रादेशिक पक्षांनी देणगीमध्ये मागे टाकले आहे.

एकूण देणग्यांपैकी 61.33 टक्के….

या निधीमध्ये कॉर्पोरेट कंपन्या आणि व्यावसायिक समूहांचा मोठा वाटा आहे. 2024-25 मध्ये प्रादेशिक पक्षांना मिळालेल्या एकूण देणग्यांपैकी 61.33 टक्के म्हणजे सुमारे 644.93 कोटी रुपये कॉर्पोरेट आणि व्यावसायिक संस्थांकडून आले. प्रूडेंट इलेक्टोरल ट्रस्टने 253.50 कोटी रुपये, तर टायगर असोसिएट्सने 160 कोटी रुपये दिले.

DMK ला सर्वाधिक 365.78 कोटी निधी

तमिळनाडूतील DMK ला सर्वाधिक 365.78 कोटी रुपयांचा निधी मिळाला. त्यापैकी मोठा हिस्सा देणगीदारांची पूर्ण माहिती नसलेल्या रकमेतून आल्याचे ADR ने नमूद केले आहे. तसेच, देशातील 67 मान्यताप्राप्त प्रादेशिक पक्षांपैकी 33 पक्षांनी अद्याप निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर आपले देणगी अहवाल सादर केलेले नसल्याचेही अहवालात म्हटले आहे.

Follow Us
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत
धान्य, फळं अन्… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने....
Pune Ganpati Visarjan : धान्य, फळं अन् उसाची शेती… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने वेधलं पुणेकरांचं लक्ष