AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अवास्तव अपेक्षा ठेवल्याने नेमके काय होते? आचार्य चाणाक्य म्हणतात…

आपल्या आवडत्या व्यक्तीने आपल्यासाठी खूप काही करावे असे अनेकांना वाटते, पण अवास्तव अपेक्षा ठेवल्याने काय होते? याबद्दल कोणाला माहिती नसते... याबद्दल देखील आचार्य चाणाक्य यांनी महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे.

अवास्तव अपेक्षा ठेवल्याने नेमके काय होते? आचार्य चाणाक्य म्हणतात...
| Updated on: May 08, 2026 | 3:42 PM
Share

आपेक्षा ठेवणे चुकीचे नाही, पण आपण आपेक्षा कोणाकडून ठेवत आहोत, हे कळणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. आपेक्षा ठेवणे हा मानवी स्वभाव आहे आणि स्वभावाला कोणतं औषध नसते. कधीकधी आपण एखाद्या व्यक्तीकडून खूप जास्त अपेक्षा ठेवतो. जेव्हा ती आपल्या अपेक्षेनुसार वागत नाहीत, तेव्हा आपल्याला प्रचंड दुःख आणि वेदना होतात. म्हणूनच, आचार्य चाणक्य म्हणतात की, आपण कोणाकडूनही खूप जास्त अपेक्षा ठेवू नये. मोठ्या अपेक्षा ठेवल्याने हळूहळू आपल्या मनावर, विचारांवर आणि नात्यांवर परिणाम होतो. तर जाणून घ्या याबद्दल चाणाक्य यांनी काय सांगितलं आहे.

आचार्य चाणक्य यांच्या मते, जेव्हा आपण कोणाकडून खूप जास्त अपेक्षा ठेवतो आणि ते आपल्या अपेक्षा पूर्ण करत नाहीत, तेव्हा आपण अत्यंत निराश होतो. यामुळे आपले मन खूप लवकर कमजोर होते. चाणक्य नीतीनुसार, इतरांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवणे आपल्या आवाक्याबाहेरचे आहे. इतरांकडून अवाजवी अपेक्षा टाळण्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे. म्हणून कोणाकडूनही कोणतीही अपेक्षा ठेवू नका.

चाणक्य नीतीनुसार, इतरांकडून मोठ्या अपेक्षा ठेवण्याच्या सवयीमुळे नात्यांमध्ये तणाव निर्माण होतो. आपल्या नात्यातील प्रिय व्यक्तीने नेहमी आपल्या अपेक्षेनुसार, आपल्या इच्छेनुसार वागावे अशी आपली नेहमीच आशा असते, परंतु प्रत्येक व्यक्तीचे विचार आणि मर्यादा वेगवेगळ्या असतात. त्यामुळे, जेव्हा समोरची व्यक्ती आपल्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही, तेव्हा गैरसमज निर्माण होतो. आणि यामुळे राग, नाराजी आणि नात्यात दुरावा निर्माण होतो. म्हणून, अवाजवी अपेक्षा ठेवणे चांगले नाही.

जेव्हा तुमच्या इतरांकडून सतत अपेक्षा असतात आणि त्या पूर्ण होत नाहीत, तेव्हा तुमचे मन विचलित होते. ‘मला जे हवे होते ते का मिळाले नाही’, ‘ते माझ्या अपेक्षेप्रमाणे का नाहीत’, असे प्रश्न सतत मनात येतात. हा विचार तुमचा मानसिक ताण वाढवतो आणि तुमचा आनंद हिरावून घेतो.

आचार्य चाणक्यांच्या मते, जेव्हा आपण इतरांकडून खूप जास्त अपेक्षा ठेवतो, तेव्हा आपला स्वतःवरील विश्वास उडतो. ज्या व्यक्तीकडून आपण खूप अपेक्षा ठेवतो, तिच्यावरच आपण आपला संपूर्ण विश्वास ठेवतो. ही मानसिकता व्यक्तीला दुर्बळ करते. या आत्मविश्वासाच्या अभावामुळे, ती व्यक्ती निश्चितपणे यश मिळवू शकत नाही. असं देखील चाणाक्य सांगतात.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा