Chanakya Niti | जर तुम्हाला अचानक धनलाभ झाला असेल, तर चाणक्य नीतीच्या 4 गोष्टी कायम लक्षात ठेवा

| Updated on: Jan 14, 2022 | 8:14 AM

आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतीमध्ये पैसे हाताळण्यासाठी आणि त्याचा योग्य वापर करण्याचे काही मार्ग सांगितले आहेत, जेणेकरून तुमच्याकडे कधीही पैशाची कमतरता होणार नाही

Chanakya Niti | जर तुम्हाला अचानक धनलाभ झाला असेल, तर चाणक्य नीतीच्या 4 गोष्टी कायम लक्षात ठेवा
chankay niti
Follow us on

मुंबई : असं म्हणतात की एखाद्या व्यक्तीला अचानक पैसा आला तर त्याला अहंकार येतो. अशा स्थितीत अहंकारामध्ये कोणतीही व्यक्ती विवेकबुद्धी हिरावून घेतो आणि व्यक्ती कधीकधी चुकीचे निर्णय घेते. पैसे असल्याची बतावणी करू लागतो आणि त्याचे इतरांशी वागणे बदलू लागते. या स्थितीत देवी लक्ष्मी अशा ठिकणी राहत नाही. आचार्य चाणक्यांच्या मते पैसा हाताळणे हे देखील एक कौशल्य आहे. आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतीमध्ये पैसे हाताळण्यासाठी आणि त्याचा योग्य वापर करण्याचे काही मार्ग सांगितले आहेत, जेणेकरून तुमच्याकडे कधीही पैशाची कमतरता होणार नाही

‘मी’ पणा सोडा
जर तुम्हाला आयुष्यात पैशाच्या कमतरतेचा सामना करायचा नसेल तर तुमच्यात अहंकार कधीही येऊ देऊ नका. अहंकारी माणसाला योग्य आणि अयोग्य यातला फरक दिसत नाही. अशा स्थितीत तो स्वत:चाच नाश करतो.

संकटाला आमंत्रण देताय
काही लोक पैशाच्या बाबतीत इतरांना त्यांच्या स्थितीची जाणीव करून देतात आणि त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न करतात. पैसे असल्याचे भासवणारे लोक एक दिवस स्वतःसाठी संकटाला आमंत्रण देतात.

सार्वजनिक हितासाठी कार्य करा
पैशातील काही हिस्सा हा नेहमी लोकहिताच्या कामात वापरला पाहिजे. यामुळे तुम्हाला लोकांचा आशीर्वाद मिळतो आणि तुमच्या घरात सुख-समृद्धी नांदते.

पैसे गुंतवा
आचार्य चाणक्य यांचे मत होते की संपत्ती वाढवायची असेल तर ती नेहमी योग्य ठिकाणी गुंतवली पाहिजे. जे पैसे जमा करून ठेवतात, ते पैसे एक दिवस संपतात. पण गुंतवणूक केल्याने तुमची संपत्ती वाढते.

टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.

संबंधीत बातम्या

Vaikuntha Ekadashi 2022 | जाणून घ्या वैकुंठ एकादशीच्या व्रताचे महत्त्व, शुभ मुहूर्त, उपासनेची पद्धत

Makar sankrant Bhogi | ‘न खाई भोगी तो सदा रोगी’ जाणून घ्या भोगीचे महत्त्व ,भाजी सर्वकाही एका क्लिकवर

Putrada Ekadashi 2022 | पौष पुत्रदा एकादशीच्या दिवशी हे सोपे उपाय करा, सर्व संकटे दूर होतील