
आपलं कुटुंब नेहमी सुखात रहावं, घरात सुख समृद्ध असावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र कधी-कधी आपण अशा काही चुका करतो, ज्या चुका कुटुंबातील वादाचं कारण बनतात, घरात भांडणं होतात, घर अशांत होतं, आपल्या देशात असे अनेक विद्वान होऊन गेले, ज्यांनी मानवाला आपलं आयुष्य कसं जगावं? याबाबत प्रत्येक टप्प्यांवर मार्गदर्शन केलं आहे, अशाच विद्वानांमध्ये चाणक्य यांचं नाव येतं. चाणक्य हे त्यांच्या काळातील एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीती तज्ज्ञ होते. मानवी जीवनाशी संबंधित असं एकही क्षेत्र सापडणार नाही, ज्याबद्दल चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये लिहिलं नाही. चाणक्य म्हणतात जेव्हा तुमच्या कुटुंबावर एखादं आर्थिक संकट येणार असेल तर त्यापूर्वीच तुम्हाला त्याचे संकेत मिळतात, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.
घरात सतत भांडणं होणं – चाणक्य म्हणतात ज्या घरात सतत भांडणं होतात, अशा घरात लक्ष्मी, पैसा कधीत टिकत नाही. सतत होणाऱ्या भांडणांमुळे घर अस्थिर बनतं, घरामध्ये प्रचंड प्रमाणात नकारात्मक शक्ती प्रवेश करते, ज्याचा परिणाम हा कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवर होतो. असं घर उद्ध्वस्त होण्यासाठी फार वेळ लागत नाही, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये घरात शांतता राहील यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असतं.
मोठ्या व्यक्तींचा अपमान – आर्य चाणक्य म्हणतात घरातील मोठे व्यक्ती हे अनुभवांचं भंडार असतात, त्यांच्याकडे प्रचंड अनुभव असतात, त्याचा उपयोग करून ते तुम्हाला सल्ला देत असतात, ज्यामुळे भविष्यात ज्या दु्र्घटना घडणार आहेत, त्यापासून तुमचा बचाव होतो. मात्र ज्या घरात नेहमी मोठ्या व्यक्तींना अपमान होतो, त्यांना योग्य -तो मान-सन्मान दिला जात नाही, त्या घरात पैसा कधीच टिकत नाही.
ज्या घरात देवाची पूजा होत नाही – चाणक्य यांच्या मते तुम्ही कितीही व्यस्त असाल, तरी दिवसातून एक ठरावीक वेळ हा देवी-देवतांच्या पूजेसाठी काढायलाच हवा, देवी देवतांची पूजा केल्यामुळे घरात प्रसन्न वातावरण निर्माण होतं. घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, ज्याचा परिणाम हा तुमच्या मनावर होतो आणि तुमचा दिवस चांगला जातो.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)