
Nails Cutting Rule: आज धवपळीच्या जगात अनेक कामे योग्य वेळेत होत नाहीत. त्यामुळे अनेक जण जमेल तसं राहिलेला कामे पूर्ण करतात. पण हिंदू धर्मात प्रत्येक कामासाठी एक वेळ आणि दिवस ठरवून देण्यात आला आहे. त्यानुसार पुर्वीची लोकं स्वतःची कामे आवरत होती… हिंदू धर्मात प्रत्येक कार्यासाठी शुभ आणि अशुभ दिवस निश्चित केले आहेत. शुद्धता आणि सौंदर्याशी संबंधित कामे, जसे की नखे आणि केस कापणे, यासाठी देखील हिंदू धर्मग्रंथांमध्ये नियम आणि दिवस सांगितले आहेत.
हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, योग्य दिवशी आणि विहित विधींनुसार नखे कापल्याने सकारात्मक परिणाम मिळतात. मात्र, हिंदू धर्मग्रंथांमध्ये काही विशिष्ट दिवशी नखे कापण्यास मनाई आहे. या चार दिवसांत नखे कापल्याने आर्थिक अडचणी आणि दारिद्र्य येऊ शकते असे शास्त्रांमध्ये सांगितले आहे. तर चला जाणून घेऊया कोणते चार दिवस नखे कापू नयेत?
शनिवार : शनिवार हा दिवस सूर्य पुत्र आणि नऊ ग्रहांपैकी सर्वात महत्वाचा असलेल्या शनिदेवाला समर्पित आहे. शकुन शास्त्रात असे म्हटले आहे की नखे आणि केस यांसारखे शारीरिक अपव्यय शनि ग्रहाशी संबंधित आहेत. या दिवशी नखे कापल्याने शनिदेव क्रोधित होऊ शकतात. यामुळे आर्थिक नुकसान, दारिद्र्य आणि दुर्दैव होऊ शकते.
मंगळवार : मंगळवार हा भगवान हनुमान आणि मंगळ ग्रहाला समर्पित मानला जातो. मंगळ हा ऊर्जा आणि धैर्याचा स्रोत मानला जातो. शास्त्रानुसार, जो व्यक्ती मंगळवारी नखे कापतो, त्याचे धैर्य आणि आत्मविश्वास कमी होतो. एवढंच नाही तर, त्याच्यावर आसलेलं कर्ज देखील वाढतं.
गुरुवार : गुरुवार हा दिवस ज्ञान, बुद्धी आणि समृद्धीचा देवता बृहस्पतिला समर्पित मानला जातो. गुरुवारी नखे कापल्याने बृहस्पति कमकुवत होतो आणि वैवाहिक अडचणी वाढतात.
रविवार : रविवार हा सूर्यदेवाचा दिवस मानला जातो. तो आत्मा, आरोग्य आणि सन्मानाचा प्रतीक आहे. या दिवशी नखे कापणे अशुभ मानले जाते. असे केल्याने आत्मविश्वास आणि आदर कमी होतो.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)