AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lord Shanidev | शनिदेवांच्या प्रकोपापासून वाचायचं असेल तर दशरथकृत शनिस्तोत्राचं पठण करा, जाणून घ्या याबाबतची माहिती

शनिदेव यांना न्यायाचे देव म्हटले जाते. एखाद्या व्यक्तीला शनिदेवांनी आशीर्वाद दिला (Dashrath Krit Shani Stotra) असेल तर त्याचे नशीब उजळतं, परंतु जर एखाद्यावर शनिदेवचा प्रकोप झाला तर त्याचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही

Lord Shanidev | शनिदेवांच्या प्रकोपापासून वाचायचं असेल तर दशरथकृत शनिस्तोत्राचं पठण करा, जाणून घ्या याबाबतची माहिती
Lord ShaniDev
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: May 01, 2021 | 3:11 PM
Share

मुंबई : शनिदेव यांना न्यायाचे देव म्हटले जाते. एखाद्या व्यक्तीला शनिदेवांनी आशीर्वाद दिला (Dashrath Krit Shani Stotra) असेल तर त्याचे नशीब उजळतं, परंतु जर एखाद्यावर शनिदेवचा प्रकोप झाला तर त्याचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही (Dashrath Krit Shani Stotra Will Save You From The Negative Effect Of Lord Shanidev Know Everything About It).

जेव्हा एखादी व्यक्ती शनिच्या साडेसाती, इतर महादशा सुरु असते, तेव्हा त्याला शारीरिक, मानसिक आणि आर्थिक अशा तिन्ही प्रकारे त्रास सहन करावा लागतो.

तुम्हाला शनिदेवच्या प्रकोपापासून वाचायचं असेल तर दर शनिवारी दशरथकृत शनि स्तोत्राचं पठण करा. असे केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि कोणत्याही प्रकारच्या शनि संबंधित त्रासातून मुक्ती मिळते. शनि स्तोत्र, त्याचे महत्त्व आणि पूजा विधी जाणून घ्या –

मान्यता काय?

मान्यता आहे की शनि स्त्रोत्रांचे रचेता हे राजा दशरथ आहे. त्यांनी या स्त्रोत्राच्या माध्यमातून शनिदेवला प्रसन्न केले होते. तेव्हा शनिदेवांनी त्यांना वरदान मागण्यास सांगितले. यानंतर, राजा दशरथने शनिदेवांना विनवणी केली की कोणताही देव, दानव, मानव, प्राणी आणि पक्षी कोणालाही यातना देऊ नये. त्यांचे म्हणणे ऐकल्यानंतर शनिदेव खूप प्रसन्न झाले आणि म्हणाले की आजनंतर जो कोणी या दशरथ शनिस्तोत्राचं पठण करेल त्याला शनिच्या प्रकोपासून मुक्ती मिळेल.

दशरथ रचित शनिस्त्रोत

नमः कृष्णाय नीलाय शितिकण्ठ निभाय च नमः कालाग्निरुपाय कृतान्ताय च वै नमः

नमो निर्मांस देहाय दीर्घश्मश्रुजटाय च नमो विशालनेत्राय शुष्कोदर भयाकृते

नमः पुष्कलगात्राय स्थुलरोम्णेऽथ वै नमः नमो दीर्घाय शुष्काय कालदंष्ट्र नमोऽस्तु ते

नमस्ते कोटराक्षाय दुर्नरीक्ष्याय वै नमः नमो घोराय रौद्राय भीषणाय कपालिने

नमस्ते सर्वभक्षाय बलीमुख नमोऽस्तु ते सूर्यपुत्र नमस्तेऽस्तु भास्करेऽभयदाय च

अधोदृष्टेः नमस्तेऽस्तु संवर्तक नमोऽस्तु ते नमो मन्दगते तुभ्यं निस्त्रिंशाय नमोऽस्तु ते

तपसा दग्ध.देहाय नित्यं योगरताय च नमो नित्यं क्षुधार्ताय अतृप्ताय च वै नमः

ज्ञानचक्षुर्नमस्तेऽस्तु कश्यपात्मज.सूनवे तुष्टो ददासि वै राज्यं रूष्टो हरसि तत्क्षणात्

देवासुरमनुष्याश्र्च सिद्ध.विद्याधरोरगाः त्वया विलोकिताः सर्वे नाशं यान्ति समूलतः

प्रसाद कुरु मे सौरे! वारदो भव भास्करे एवं स्तुतस्तदा सौरिर्ग्रहराजो महाबलः

शनिस्तोत्राचं पठण कसं करावं?

शनिवारी सकाळी लवकर उठून किंवा संध्याकाळी या शनिस्त्रोत्राचे पठण करु शकता. पूजा करण्यापूर्वी आंघोळ करा आणि स्वच्छ कपडे घाला. शनिदेवासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. यानंतर, त्यांना मनापासून नमन करा आणि दशरथ शनिस्तोत्राचं पठण करा आणि त्रासांपासून मुक्त होण्यासाठी प्रार्थना करा. पूजन झाल्यानंतर शनिदेवाच्या मंदिरात जा आणि काळी तीळ किंवा मोहरीचे तेल अर्पण करा. शक्य असल्यास आपल्या क्षमतेनुसार गरजूंना दान करा.

Dashrath Krit Shani Stotra Will Save You From The Negative Effect Of Lord Shanidev Know Everything About It

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Follow Us
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी