
मुंबई : आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी (Devshayani Ekadashi 2023) आणि आषाढी एकादशी (Aashadhi Ekadashi 2023) म्हणतात. यंदा देवशयनी एकादशी गुरुवार, 29 जूनला म्हणजेच उद्या साजरी होणार आहे. देवशयनी एकादशीच्या दिवसापासून भगवान विष्णू क्षीरसागरात योगनिद्रेत जातात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. देवशयनी एकादशी ही सर्व एकादशींमध्ये सर्वात विशेष मानली जाते. या दिवयापासून चार महिने कोणतेही शुभ कार्य होत नाही. लग्नासह सर्व शुभ कार्यांवर बंदी असते.
हिंदू पंचांगानुसार, अधिक महिन्यांमुळे, यावेळी भगवान विष्णू 4 महिन्यांऐवजी 5 महिने योग निद्रामध्ये राहतील. यामुळे 5 महिने कोणतेही शुभ कार्य होणार नाही.
देवशयनी एकादशीची तिथी गुरुवार, 29 जून रोजी पहाटे 3.17 वाजता सुरू होऊन 30 जून रोजी पहाटे 5.46 वाजता समाप्त होईल. सकाळी 5:26 ते 8:09 पर्यंत पूजेचा शुभ मुहूर्त आहे.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)