Diwali 2022: लक्ष्मी पूजनाला झेंडूची फुलं का वापरतात? जाणून घ्या महत्त्व

नेहमी पूजनाला झेंडूच्या फुलांचे विशेष महत्त्व आहे. शुभ प्रसंगी झेंडूच्या फुलांचे तोरण दाराला हमखास लावल्या जातात. यामागे काय कारण आहे?

Diwali 2022: लक्ष्मी पूजनाला झेंडूची फुलं का वापरतात? जाणून घ्या महत्त्व
झेंडूची फुलं
Image Credit source: Social Media
| Updated on: Oct 21, 2022 | 9:59 PM

मुंबई, दिवाळीनिमित्त (Diwali 2022) सगळीकडे बाजारपेठ सजल्या आहेत पणत्या, रांगोळ्या, आकाश दिवे याशिवाय झेंडूची (Zendu Flower) मोठ्या प्रमाणात दिसतात. दिवाळीत झेंडूच्या फुलांचे विशेष महत्त्व आहे. याशिवाय  तुम्ही तुमच्या घरात कोणतेही धार्मिक कार्य केले असेल, तेव्हा  झेंडूच्या फुलांची माळ किंवा तोरण नक्कीच आणले असेल. एरवी पूजेत गुलाबाच्या फुलांचा उपयोग केला जातो. मात्र लक्ष्मी पूजनात झेंडूच्या फुलांना विशेष महत्त्व आहे. यामागचे नेमके कारण अनेकांना माहिती नाही. याचे कारण पौराणिक कथांमध्ये आढळते.

झेंडूच्या फुलाचे महत्त्व

झेंडूच्या फुलाचा भगवा रंग त्याग आणि समर्पण दर्शविते. झेंडूच्या फुलाच्या असंख्य पाकळ्या एकाच बियाच्या साहाय्याने गुंफली जातात हे या फुलाचे वैशिष्ट्य आहे. ज्याप्रकारे एक सकारात्मक विचार जीवनातल्या असंख्य घटकांना बांधून ठेवतो त्याच प्रमाणे  एक सशक्त बीज असंख्या पाकळ्यांना धरून ठेवते.

इतर सर्व फुलांपैकी झेंडू हे एकमेव फूल आहे. जे स्वतःच्याच एका छोट्या बीजाच्या  साहाय्याने वाढतात आणि एका रोपट्यातून अनेक रोपांची निर्मिती होते. हे आत्म्याचे वैशिष्ट्य दर्शविते, की आत्मा अमर असतो, तो फक्त शरीर बदलतो आणि पुन्हा वेगवेगळ्या रूपात येतो.

मुख्य दरवाजाबाहेर झेंडूच्या फुलांचे तोरण लावणे देखील शुभ मानले जाते. मान्यतेनुसार झेंडूची फुले नकारात्मकतेपासून दूर राहण्यास मदत करतात. दारावर झेंडूचे तोरण लावल्याने घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही.

याशिवाय झेंडूच्या फुलात माता लक्ष्मीचा वास असतो अशी मान्यता आहे. कमळाच्या फुलांव्यतिरिक्त देवीला झेंडूची फुलंही प्रिय आहेत.  म्हणून लक्ष्मीच्या पूजेत झेंडूच्या फुलांचा वापर होतो.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)