Diwali 2026: धनत्रयोदशीच्या दिवशी आवर्जून करा हे उपाय; वर्षभर घरात नांदेल सुख-समृद्धी

Dhanatrayodashi 2026: धनत्रयोदशीच्या दिवशी देवी लक्ष्मी, भगवान कुबेर आणि भगवान धन्वंतरी यांची पूजा केली जाते. यंदा ६ नोव्हेंबरला धनत्रयोदशी असून या दिवशी काही खास उपाय करणे शुभ मानले जाते. जाणून घेऊया वर्षभर घरात सुख-समृद्धी आणि देवी लक्ष्मीची कृपा टिकून राहण्यासाठी कोणते उपाय करावे.

Diwali 2026: धनत्रयोदशीच्या दिवशी आवर्जून करा हे उपाय; वर्षभर घरात नांदेल सुख-समृद्धी
diwali
| Edited By: | Updated on: Nov 04, 2026 | 5:03 PM

दिवाळीच्या पाच दिवसांच्या सणाची सुरुवात धनत्रयोदशीपासून होते. हा दिवस सुख, समृद्धी आणि ऐश्वर्याचे प्रतीक मानला जातो. या दिवशी देवी लक्ष्मी, भगवान गणेश, भगवान कुबेर आणि भगवान धन्वंतरी यांची पूजा केली जाते. यंदा ६ नोव्हेंबर २०२६ रोजी धनत्रयोदशी साजरी केली जाणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी काही खास उपाय केल्याने घरात सुख-समृद्धी टिकून राहते आणि आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते. जाणून घेऊया धनत्रयोदशीच्या दिवशी कोणते उपाय करणे शुभ मानले जाते.
सूर्यास्तानंतर १३ दिवे लावा
धार्मिक मान्यतेनुसार, धनत्रयोदशीच्या दिवशी सूर्यास्तानंतर १३ दिवे लावावेत. या दिव्यांजवळ १३ कवड्याही ठेवाव्यात. यातील पहिला दिवा यमराजाच्या नावाने घराच्या दक्षिण दिशेला लावावा. रात्रीच्या वेळी या कवड्या घरातील स्वच्छ ठिकाणी ठेवाव्यात. असे केल्याने धनाशी संबंधित अडचणी दूर होतात, अशी मान्यता आहे.
धनवर्षा पोटली तयार करा
धनत्रयोदशीच्या दिवशी धनवर्षा पोटली तयार करणे शुभ मानले जाते. यासाठी संध्याकाळी पूजेच्या वेळी लाल कपड्यात सात कवड्या, तीन गोमती चक्र, हळकंड, अखंड तांदूळ आणि एक रुपयाचे नाणे बांधावे. त्यानंतर या पोटलीची पूजा करून ती पैसे ठेवण्याच्या ठिकाणी किंवा तिजोरीत ठेवावी. यामुळे वर्षभर घरात धनाची कमतरता भासत नाही, अशी धार्मिक मान्यता आहे.
देवी लक्ष्मीला अख्खे धणे अर्पण करा
धनत्रयोदशीच्या दिवशी अख्खे धणे खरेदी करणे शुभ मानले जाते. या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान धन्वंतरी यांना अख्खे धणे अर्पण करावेत. पूजेनंतर त्याचा प्रसाद म्हणून वाटप करावे आणि काही धणे तिजोरीत ठेवावेत. असे केल्याने घरात देवी लक्ष्मीचा कायमस्वरूपी वास राहतो, अशी मान्यता आहे.
कुबेर यंत्राची स्थापना करा
धनत्रयोदशीच्या दिवशी कुबेर यंत्राची स्थापना करणे शुभ मानले जाते. हे यंत्र घराच्या उत्तर दिशेला स्थापित करावे. यंत्राची स्थापना करताना ‘ॐ यक्षाय कुबेराय नमः’ या मंत्राचा जप करावा. असे केल्याने भगवान कुबेर प्रसन्न होतात आणि धन प्राप्तीचे योग निर्माण होतात, अशी धार्मिक मान्यता आहे.
कापूर आणि लवंगाचा उपाय करा
धनत्रयोदशीच्या दिवशी तिजोरीची स्वच्छता करावी. त्यानंतर कापरामध्ये लवंग टाकून तो पेटवावा. धार्मिक मान्यतेनुसार, हा उपाय केल्याने घरात सुख-समृद्धी टिकून राहते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us