दिल्लीच्या अक्षरधाम मंदिरात भक्तीभावाने साजरी झाली दिवाळी, लक्ष दीव्यांनी उजळले स्वामीनारायण मंदिर

दिवाळीचा सण दिल्लीच्या प्रसिध्द अक्षरधाम मंदिरात मोठ्या श्रद्धा आणि भक्तीभावाने साजरा करण्यात आला आहे. या वेळी लक्ष दिव्यांनी अक्षरधाम मंदिर उजळले गेले.

दिल्लीच्या अक्षरधाम मंदिरात भक्तीभावाने साजरी झाली दिवाळी, लक्ष दीव्यांनी उजळले स्वामीनारायण मंदिर
Akshardham Temple
| Updated on: Oct 20, 2025 | 4:45 PM

प्रकाश पर्व आणि दीपोत्सवाचा सण दिवाळी यंदा नवी दिल्लीतील स्वामीनारायण अक्षरधाम मंदिरात यंदा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवात लोकांच्या श्रद्धा, भक्ती आणि समर्पणाचा उत्साह दिसून आला. या दीपावली उत्सवात ज्येष्ठ संत, हजारो भक्त आणि स्वयंसेवकांनी पारंपारिक विधी आणि पूजा करुन हा सण एकसाथ साजरा केला आहे.

या उत्सवाच्या साखळीची सुरुवात १७ ऑक्टोबर रोजी गोवत्स द्वादशीच्या संगे झाली, ज्यानंतर १९ ऑक्टोबर रोजी काळी चौदसच्या दिवशी, हनुमानजीचे विशेष पूजन केले. ज्यात जीवनातील सर्व नकारात्मकता आणि अंधकाराला दूर करणे आणि सर्वांच्या कुटुंबामध्ये, विश्वामध्ये शांतता आणि सद्भाव कायम राहावा यासाठी विशेष प्रार्थनेचे आयोजन केले.

दिवाळीच्या दिवशी वहिपूजन विधीत वहिखात्यांचे पारंपारिक रुपाने पूजन केले गेले. ज्यात हजारो यजमानांनी हरिभक्तांनी आपल्या वहिखात्यांना देवाच्या चरणात ठेवून शुभ लक्ष्मीचा संकल्प केला.

या निमित्ताने दिल्लीतील अक्षरधाम मंदिराचे मुख्य प्रभारी संत, पूज्य मुनिवत्सलदास स्वामींनी या प्रकाश पर्वाच्या निमित्ताने जीवनात गुरुच्या प्रकाश आणण्याचे मर्म समजावले. तसेच गुरुजी महंत स्वामीजी महाराजांचा आशीर्वाद सर्वांना मिळा यासाठी प्रार्थना केली.

अक्षरधाम मंदिराचा परिसर फुले, रंगीबेरंगी तोरणे आणि दीव्यांनी सजवलेला होता. हजारो दीव्यांच्या प्रकाशांनी संपूर्ण अक्षरधाम जगमगले होते. त्यामुळे संपूर्ण वातावरणात दिव्यत्व जाणवत होते. या उत्सवाच्या यशस्वी आयोजनात संस्थेच्या स्वयंसेवकांचे महत्वाचे योगदान होते. या स्वयंसेवकांनी रात्र दिवस सेवा कार्यात सहभाग घेत नि:स्वार्थ भावनेने प्रेम आणि समर्पणाची प्रचिती दिली.

दीपावलीचा सण – अंध:कारावर प्रकाश आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतिक आहे

संतांनी आपल्या प्रवचनात सर्वांना आपल्या दैनंदिन जीवनात भक्ती आणि ज्ञानाचा प्रकाशाला आपल्या जीवनात आत्मसात करण्यासाठी प्रोत्साहित केले गेले. अक्षरधाममध्ये साजरा केलेला हा भव्य उत्सव सर्व भक्तांना भक्ती, प्रेम आणि सृहृद्भावासह एक होऊन धर्माच्या मार्गावर पुढे जाण्याची प्रेरणा देत आहे.