Dhantrayodashi 2026: धनत्रयोदशीला चुकूनही खरेदी करू नका ‘या’ वस्तू; मानल्या जातात अशुभ
धनत्रयोदशीला सोने-चांदी खरेदी करण्याची परंपरा आहे. मात्र, वास्तुशास्त्र आणि धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी काही वस्तूंची खरेदी करणे अशुभ मानले जाते. जाणून घेऊया कोणत्या वस्तू धनत्रयोदशीला खरेदी करणे टाळावे.

धनत्रयोदशी हा दिवाळीतील महत्त्वाचा सण आहे. शुक्रवार, 6 नोव्हेंबर २०२६ रोजी धनत्रयोदशी साजरी केली जाणार आहे. या दिवशी देवी लक्ष्मी आणि कुबेर देवाची पूजा केली जाते. या दिवशी सोने, चांदी आणि नवीन वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहे. मात्र, वास्तुशास्त्रानुसार धनत्रयोदशीच्या दिवशी काही वस्तू खरेदी करणे टाळावे, असे सांगितले जाते. या वस्तू घरात आणणे अशुभ मानले जाते. त्यामुळे धनत्रयोदशीच्या खरेदीला जाण्यापूर्वी कोणत्या ५ वस्तू खरेदी करणे टाळावे, हे जाणून घेऊया.
१. लोखंडाच्या वस्तू
धनत्रयोदशीच्या दिवशी लोखंडाच्या वस्तू खरेदी करणे टाळावे, असे वास्तुशास्त्रात सांगितले जाते. लोखंडाचा संबंध शनिदेवाशी जोडला जातो. त्यामुळे या दिवशी लोखंडाऐवजी पितळ, चांदी किंवा तांब्याच्या वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते.
२. काचेच्या वस्तू
धनत्रयोदशीला काचेच्या वस्तू खरेदी करणे टाळावे, अशी मान्यता आहे. वास्तुशास्त्रानुसार काच अस्थिरतेचे प्रतीक मानली जाते. त्यामुळे या दिवशी काचेची भांडी, क्रॉकरी किंवा सजावटीच्या वस्तू घरी आणू नयेत, असे सांगितले जाते.
३. चाकू-कात्रीसारख्या धारदार वस्तू
धनत्रयोदशीच्या दिवशी चाकू, कात्री आणि सुई यांसारख्या धारदार वस्तू खरेदी करू नयेत. वास्तुशास्त्रानुसार अशा वस्तू शुभ दिवशी घरी आणणे योग्य मानले जात नाही. त्यामुळे खरेदी करताना या वस्तू टाळण्याचा सल्ला दिला जातो.
४. काळ्या रंगाच्या वस्तू
धनत्रयोदशीच्या दिवशी काळ्या रंगाच्या वस्तू खरेदी करणे टाळावे, असे मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार काही विशेष पूजा वगळता शुभ कार्यांमध्ये काळ्या रंगाचा वापर टाळला जातो. त्यामुळे या दिवशी काळ्या रंगाच्या वस्तू घरी आणू नयेत, असे सांगितले जाते.
५. प्लास्टिकच्या वस्तू
धनत्रयोदशीला प्लास्टिकच्या वस्तू खरेदी करणे सुद्धा अशुभ मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार प्लास्टिकच्या वस्तू शुभतेचे प्रतीक मानल्या जात नाहीत. अशा वस्तू घरात आणल्याने सुख-समृद्धीवर परिणाम होतो आणि आर्थिक अडचणी येतात, अशी धार्मिक मान्यता आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)