Vastu Tips : घरात ‘या’ 5 ठिकाणी ठेवताय रिकामी भांडी, सवय ताबडतोब बदला, नाहीतर वाढू शकते गरिबी

Vastu Tips : हिंदू धर्मात वास्तूशास्त्राला फार मोठं महत्त्व आहे. वास्तूशास्त्रात भांडी कशी वापरावी आणि कुठे रिकामी भांडी ठेवू नये याबद्दल देखील सांगितलं आहे. तर जाणून घ्या घरात रिकामी भांडी कुठे ठेऊ नये

Vastu Tips : घरात या 5 ठिकाणी ठेवताय रिकामी भांडी, सवय ताबडतोब बदला, नाहीतर वाढू शकते गरिबी
| Updated on: Nov 25, 2026 | 3:52 PM

Vastu Tips : अनेकांची एकच समस्या असते की घरात पैसेच टिकत नाहीत. काही समस्यांपासून दूर राहण्यासाठी वास्तूशास्त्राचे काही नियम पाळले पाहिडे. रिकाम्या भांड्यांसाठी देखील काही नियम सांगण्यात आले आहे. अनेकदा आपल्याकडून अशा काही चुका होतात ज्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा रोखली जाते. अशीच एक सामान्य सवय म्हणजे घरात रिकामी भांडी तशीच पडून ठेवणे. तर जाणून घ्या घरात अशा पाच जागा असतात, जेथे कधीच रिकामी भांडी ठेवू नये…

स्वयंपाकघर घरातील एक मुख्य ठिकाण आहे. स्वयंपाकघरात, विशेषतः गॅस किंवा स्टोव्हवर रिकामी भांडी कधीही ठेवू नयेत. स्टोव्हवर ठेवलेलं रिकामं भांडं अशुभ मानलं जातं. या चुकीमुळे घरात अन्न आणि पैशाची कमतरता भासते. भांड्यांचे काम झाल्यावर ती धुऊन व्यवस्थित त्यांच्या जागी ठेवा.

Loading...

पूजास्थळात किंवा मंदिरात रिकामी भांडी ठेवू नका: पूजास्थळात कोणतंही भांडं कधीही रिकामे ठेवू नका. देवाला नैवेद्य अर्पण करण्याचं पात्र किंवा पूजेचं भांडं कधीच रिकामं ठेऊ नका. वापरात नसताना भांडी उलटी ठेवा. पूजा झाल्यावर लगेच भांडी तिथेच सोडून देणं चुकीचे मानलं जातं.

लोक अनेकदा रात्री आपल्या पलंगाजवळ पाण्याचा ग्लास ठेवतात, जेणेकरून तहान लागल्यावर त्यांना उठावं लागणार नाही. सकाळी उठल्याबरोबर तो रिकामा ग्लास तिथेच राहतो, पण तुम्हाला माहित आहे का की झोपण्याच्या जागेजवळ रिकामं भांडं ठेवणं अजिबात योग्य मानलं जात नाही. असं केल्याने खोलीतील सकारात्मक ऊर्जेवर परिणाम होतो आणि त्यामुळे मानसिक ताण किंवा आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात.

सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा मुख्य दरवाजातून घरात प्रवेश करते. त्यामुळे, मुख्य दरवाजाजवळ कोणतीही रिकामी भांडी किंवा पात्र कधीही ठेवलेली नाहीत याची खात्री करा. यामुळे घराच्या प्रगतीला अडथळा येतो आणि कामात अडथळे निर्माण होतात.

रात्री जेवणाच्या टेबलावर रिकामी भांडी ठेवू नका. जेवणानंतर, लोक अनेकदा जेवणाच्या टेबलावर भांडी तशीच ठेवून झोपतात. रात्री जेवणाच्या टेबलावर रिकामी भांडी ठेवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा वाढते. म्हणून, झोपण्यापूर्वी नेहमी जेवणाचं टेबल पूर्णपणे स्वच्छ करा आणि सर्व भांडी काढून टाका.

(डिस्क्लेमर: सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us