Holi 2021 | होलिका दहनाच्या राखेने घरात करा हे उपाय, सर्व संकटं होतील दूर…

| Updated on: Mar 27, 2021 | 10:21 AM

वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून होलिका दहन केलं जातं (Do These Upay With The Ash Of Holika Dahan). यानंतर आनंद, उत्साह साजरा करण्यासाठी रंगांनी होळी खेळली जाते.

Holi 2021 | होलिका दहनाच्या राखेने घरात करा हे उपाय, सर्व संकटं होतील दूर...
holika dahan
Follow us on

मुंबई : वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून होलिका दहन केलं जातं (Do These Upay With The Ash Of Holika Dahan). यानंतर आनंद, उत्साह साजरा करण्यासाठी रंगांनी होळी खेळली जाते. यावेळी होलिका दहन 28 मार्चला केलं जाईल. मान्यतेनुसार, होलिका दहनच्या वेळी जर काही विशेष उपाय केले तर कुठलंही मोठं संकट टळल्या जाऊ शकते. येथे जाणून घ्या काही खास उपाय (Do These Upay With The Ash Of Holika Dahan For Major Problems In The House) –

1. जन्मकुंडलीमध्ये जर ग्रह दोष आसेल आणि नेहमी तुमच्या आयुष्यात कुठली ना कुठली समस्या येत असेल तर होलिका दहनची राख थंड झाल्यानंतर घरी घेऊन या आणि त्याला पाण्यात मिसळून शिवलिंगवर वाहा आणि महादेवाला प्रार्थना करा.

2. घरात जर कुणी आजारी असेल तर होलिका दहनच्या राख आजारी व्यक्तीच्या शरीरावर शिंपडा. त्याशिवाय त्यांच्या पलंगावरही शिंपडी यामुळे त्यांना आराम मिळेल.

3. जर नौकरीमध्ये कुठल्या प्रकारची समस्या येत असेल तर एक नारळ सात वेळा क्लॉकवाईज फिरवा आणि आपल्या कुलदेवाला स्मरण करुन मनात काम पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करा आणि या नारळाला होळीच्या अग्नित टाका.

4. कर्जातून मुक्तू हवी असेल तर होलिका दहनाच्या रात्री भगवान नरसिंहाची पूजा करा आणि नरसिंह स्तोत्राचं पठन करा. नरसिंह अवतार भगवान विष्णूंच्या 12 स्वरुपांपैकी एक आहे. हा अवतार भगवानने भक्त प्रल्हादला त्याच्या पित्यापासून वाचवण्यासाठी घेतला होता.

5. जर तुम्हाला यश प्राप्त करायचं असेल तर होलिका दहनानंतर त्या स्थानावर लोकांना सुपारी आणि पान भेट म्हणून द्या.

6. जर घराला कोणाची वाईट नजर लागली असेल तर कुठल्या व्सतूने नजर काढून ती वस्तू होलिका दहनच्या अग्नित टाका (Do These Upay With The Ash Of Holika Dahan For Major Problems In The House).

7. घरात अनेक काळापासून वाईट काळ सुरु असेल आणि तुम्हाला यापासून सुटका हवी असेल तर होळीच्या राखेला घरी आणून त्यात राई आणि खडा मीठ चाका आणि हे घरातील शुद्ध स्थानावर ठेवा. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होईल.

8. दान केल्याने अनेक कष्ट दूर होतात. होलिका दहननंतर गरीब आणि गरजुंना आपल्या सामर्थ्यानुसार काहीही दान करा.

Do These Upay With The Ash Of Holika Dahan For Major Problems In The House

संबंधित बातम्या :

Holi 2021 | आयुष्यात आनंदाचा रंग हवा असेल तर तुमच्या राशीनुसार रंग निवडा आणि उत्साहात होळी साजरी करा…

Rang Panchami 2021 : देवी-देवतांच्या होळीचा दिवस म्हणजे रंगपंचमी, जाणून घ्या कधी आणि कुठे साजरी केली जाते…