अविवाहित मुलींनी इच्छित वर हवा? मग शुक्रवारी करा हे खास उपाय

शुक्रवारी लक्ष्मी मातेची पुजा आणि उपवास करण्यासोबतच विवाह आणि इच्छित वर मिळावा यासाठी काही खास उपाय देखील केले जातात. कारण असे मानले जाते की ज्यामुलींची लग्न जुळत नाही त्यांनी शुक्रवारी हे विशेष उपाय केल्यास त्यांना त्यांच्या मनासारखा जोडीदार मिळतो. चला तर मग या खास उपायांबद्दल जाणून घेऊयात...

अविवाहित मुलींनी इच्छित वर हवा? मग शुक्रवारी करा हे खास उपाय
marraige
| Edited By: | Updated on: Dec 06, 2025 | 3:50 PM

आज शुक्रवार आहे. हिंदू धर्मग्रंथांमध्ये शुक्रवार हा लक्ष्मी मातेला समर्पित आहे. लक्ष्मी माता ही संपत्ती आणि समृद्धीची देवी आहे. या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा आणि उपवास विहित विधींनुसार केला जातो. तसेच लक्ष्मी मातेची पूजा आणि उपवास केल्याने आर्थिक अडचणी कधीच निर्माण होत नाही. लक्ष्मी मातेच्या आशीर्वादाने तुमचे घर नेहमीच संपत्ती आणि समृद्धीने भरलेले राहते.

तर शुक्रवारी लक्ष्मी मातेची पूजा आणि उपवास करण्यासोबतच, विवाह आणि इच्छित वर मिळावा यासाठी विशेष उपाय केले जातात. असे मानले जाते की जर अविवाहित मुलींनी शुक्रवारी हे विशेष उपाय केले तर विवाहातील अडथळे दूर होतात. त्याचबरोबर शुक्र ग्रह त्यांच्या कुंडलीला बळकटी देतो, ज्यामुळे विवाहाचा योग निर्माण होते. शिवाय त्यांना त्यांचा इच्छित जोडीदार मिळतो.

शुक्रवारी हे उपाय करा

महादेवाची पूजा

ज्या मुलींचे लग्न जमत नाही किंवा लग्न जुळताना अडचणी येतात त्यांनी शुक्रवारी भगवान शिवाची पूजा करावी. भगवान शिवाला पांढरे कपडे अर्पण करावेत. भगवान शिवाचा अभिषेक करावा. यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात आणि ते तुम्हाला इच्छित जोडीदार मिळावा असा आशीर्वाद देतात.

पार्वती मातेची पूजा

अविवाहित मुलींनी शुक्रवारी स्नान करून योग्य विधींनी पार्वती मातेची पूजा करावी आणि त्यासोबतच ध्यान देखील करावे. पूजेदरम्यान मुलींनी पार्वती मातेला सिंदूर अर्पण करावे. या उपायामुळे लवकर विवाह होतो असे मानले जाते.

पांढरे कपडे आणि सुगंधी द्रव्य दान

शुक्रवारी गरजू महिलांना पांढरे कपडे आणि सुगंधी द्रव्य दान करा. पांढरा रंग शुक्र ग्रहाचा मानला जातो. असे केल्याने शुक्र ग्रह प्रसन्न होतो. जर तुमच्या कुंडलीत शुक्र अनुकूल स्थितीत असेल तर लग्नातील अडथळे दूर होतात.

हे सर्व उपाय करून पहा

शुक्रवारी गाईला हिरवे गवत किंवा गूळ मिसळलेली भाकरी खायला द्या. वग्रह मंदिरात जाऊन शुक्र ग्रहाची पूजा करा. 21 शुक्रवार संतोषी मातेचे व्रत करा. या उपायांमुळे विवाहातील अडथळे दूर होण्यास मदत होते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)