बुधवारी चुकूनही 3 गोष्टी करु नका, नाहीतर घरात कलह निर्माण होतील

हिंदू धर्मामध्ये प्रत्येक देवासाठी एक विशेष दिवस ठरवण्यात आला आहे. या दिवशी कोणते काम करावे या संबंधी काही नियम देखील ठरवण्यातल आले आहेत. म्हणजेच या दिवशी कोणते कपडे परिधान करावे कोणती कामे करावी हे सर्व नियम ठरवण्यात आले आहे.

बुधवारी चुकूनही 3 गोष्टी करु नका, नाहीतर घरात कलह निर्माण होतील
ganpati
| Edited By: | Updated on: Nov 17, 2021 | 9:39 AM

मुंबई : हिंदू धर्मामध्ये प्रत्येक देवासाठी एक विशेष दिवस ठरवण्यात आला आहे. या दिवशी कोणते काम करावे या संबंधी काही नियम देखील ठरवण्यातल आले आहेत. म्हणजेच या दिवशी कोणते कपडे परिधान करावे कोणती कामे करावी हे सर्व नियम ठरवण्यात आले आहे.

हिंदू धर्मानुसार बुधवारचा दिवस आपल्या लाडक्या गणपती बप्पासाठी ठेवण्यात आला आहे. या दिवशी गणपतीची पुजा अर्चना केल्यास आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. पण या दिवशी काही गोष्टी करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्या 3 गोष्टी आपण या दिवशी केल्या तर आपल्या आयुष्यावर त्याचे वाईट परिणाम होतात. चला तर मग समजून घेऊयात कोणत्या आहेत त्या 3 गोष्टी

स्त्री शक्तीचा अपमान करु नका

ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी मुलीचा अपमान करू नये, या दिवशी कोणत्याही शुभ कार्याला जाण्यापूर्वी मुलींकडून शुभेच्छा घ्या. यामुळे तुमच्या दिवसाची सुरुवात चांगली होईल. त्याच प्रमाणे कोणत्याही किन्नराची चेस्टा या दिवशी करु नये. त्यांना या दिवशी भेटवस्तू दिल्यास तुम्हाला पुण्यप्राप्त होईल.

दूध जाळू नका

बुधवारी दूध कधीही जाळू नये. एवढेच नाही तर या दिवशी शक्यतो घरात खीर, रबडी सारखे पदार्थ बनवू नये. यासोबतच बुधवारी मूग डाळ, धणे, पालक किंवा मोहरी, हिरवी मिरची, पपई आणि पेरू खरेदी करू नये.

पुरुषांनी सासरी जाऊ नये?

ज्योतिषशास्त्रानुसार बुधवारी पुरुषांनी सासरच्या घरी जाऊ नये. यामुळे दुःखद घटनाही घडू शकते. याशिवाय बुधवारच्या दिवशी मावशी, वहिनी किंवा विवाहित बहीण-मुलीला बोलावू नये. बुधवारी नवीन शूज आणि कपडे खरेदी करणे आणि परिधान करणे या दोन्ही गोष्टी टाळण्याचा सल्ला दिला जातो.

टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.

इतर बातम्या : 

Chanakya Niti | हातात पैसा टिकत नाही, देवी लक्ष्मीला प्रसन्न ठेवायचंय? , तर चाणक्य नीतीमध्ये सांगितलेल्या 3 गोष्टी आत्मसात करा

Kartik Purnima 2021 | कार्तिक पौर्णिमेला 5 गोष्टी नक्की करा, आयुष्यातील सर्व दु:ख दूर होतील

आर्थिक विवंचनेत आहात?, घरी हे 3 फोटो लावा धनलाभ नक्की होईल