Chanakya Niti | हातात पैसा टिकत नाही, देवी लक्ष्मीला प्रसन्न ठेवायचंय? , तर चाणक्य नीतीमध्ये सांगितलेल्या 3 गोष्टी आत्मसात करा

आपले आयुष्या जागताना आपल्याला अनेक समस्या येतात. बहूतेक वेळा या समस्यांचेकारण पैसा असते. माता लक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी अनेक वर्षापूर्वी आचार्य चाणक्या यांनी काही उपाय सांगितले होते.

Chanakya Niti | हातात पैसा टिकत नाही, देवी लक्ष्मीला प्रसन्न ठेवायचंय? , तर चाणक्य नीतीमध्ये सांगितलेल्या 3 गोष्टी आत्मसात करा
लहानपणापासूनच मुलांना महापुरुषांच्या कथा मुलांनी सांगाव्यात, यागोष्टीमुळे मुलांना प्रेरणा मिळते आणि चांगल्या विचारांची भरभराट होते. त्याच प्रमाणे त्याचा एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन ही योग्य पद्धतीने तयार होतो.

मुंबई : आपले आयुष्य जगताना आपल्याला अनेक समस्या येतात. बहुतेक वेळा या समस्यांचे कारण पैसा असते. माता लक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी अनेक वर्षापूर्वी आचार्य चाणक्य यांनी काही उपाय सांगितले होते. त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीत जीवनाचे रहस्य दडलेले आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. चला तर मग जाणून घेऊयात हातातील पैसे टिकवण्यासाठी कोणते उपाय करणे गरजे असते. देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने व्यक्तीला सन्मान आणि आनंद दोन्ही मिळतात. तर या उलट आयुष्यात पैशाची कमतरता असेल तर आयुष्यात अडचणींमध्ये वाढ होते. पण ज्या दिवशी तुमच्याकडे पैसा असेल त्या दिवशी तुम्ही 3 गोष्टी कधीही विसरु नका.

अहंकारापासून दूर रहा

चाणक्याच्या मतानुसार, धनाच्या आगमनामुळे व्यक्तीच्या आयुष्यात अनेकदा वाईट सवयी देखील येतात. त्यामुळे पैशाच्या बाबतीत सावध आणि जागरूक असले पाहिजे. जेव्हा पैशाचा प्रश्न येतो तेव्हा तुम्ही स्वतःचा अभिमान बाळगू नये. जे अहंकारी असतात, त्यांचे भविष्य अंधकारमय बनते आणि जे अहंकारी असतात ते देवी लक्ष्मीना आवडत नाही. माता लक्ष्मी चंचल असते अशी मान्यता आहे. त्यामुळे हातात पैसा आल्यावर त्याचा वाईट उपयोग होणार नाही याची काळजी घ्यावी.

रागापासून दूर राहा

चाणक्य नुसार, व्यक्तीने नेहमी स्वतःवर रागापासून दूर राहावे. राग हा जीवनातील सर्वात धोकादायक दोष आहे, जो नेहमी चुकीला प्रोत्साहन देतो. राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू मानला जातो. पैसा आल्यानंतर रागाचा नव्हे तर संयमाचा अवलंब करावा.

तोंडात साखर असावी

पैशामुळे आपले बोलणे वाईट करू नये. पैशाच्या अहंकारात अनेकदा लोकांचे बोलणे बिघडते, त्यामुळे आपण इतरांचा अपमान करतो. ते करणार्‍यांच्या घरातून जशी लक्ष्मी दूर होते. यामुळेच माणसाने आपल्या भाषेबद्दल आणि बोलण्याबद्दल काळजी घेतली पाहिजे.

टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.

इतर बातम्या : 

Numerology Today 15, November 2021| सरळ मार्गी, धैर्यवान, प्रगल्भ बुध्दीमत्ता जाणून घ्या शुभ अंक 03 असणाऱ्या लोकांबद्दल सर्वकाही

Chanakya Niti | गर्दीतही एकटे वाटतयं ? स्वत: चा शोध घेण्यासाठी आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 6 गोष्टी मरेपर्यंत लक्षात ठेवा

Vastu shastra | मुलांचं अभ्यासात मन लागत नाही आहे? मग हे वास्तु बदल करुनच पाहा

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI