Chanakya Niti | गर्दीतही एकटे वाटतयं ? स्वत: चा शोध घेण्यासाठी आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 6 गोष्टी मरेपर्यंत लक्षात ठेवा

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Nov 16, 2021 | 9:08 AM

आचार्य चाणक्य यांनी जीवनातील प्रत्येक पैलू सांगितले आहेत. आचार्यांनी आपल्या धोरणांमध्ये वर्षापूर्वी ज्या गोष्टींचा उल्लेख केला होता त्या गोष्टी आजच्या जिवनातही लागू होतात.

Chanakya Niti | गर्दीतही एकटे वाटतयं ? स्वत: चा शोध घेण्यासाठी आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 6 गोष्टी मरेपर्यंत लक्षात ठेवा
chankaya niti

Follow us on

मुंबई : आचार्य चाणक्य यांनी जीवनातील प्रत्येक पैलू सांगितले आहेत. आचार्यांनी आपल्या धोरणांमध्ये वर्षापूर्वी ज्या गोष्टींचा उल्लेख केला होता त्या गोष्टी आजच्या जिवनातही लागू होतात. आचार्यांच्या नीतीशास्त्र या ग्रंथात त्यांनी धर्म, समाज, राजकारण, पैसा इत्यादी सर्व विषयांबद्दल बरेच काही सांगितले आहे.आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या त्या 6 गोष्टी तुम्ही आयुष्यात लक्षात ठेवल्या तर आयुष्यातील कोणत्याही समस्येतून तुम्ही बाहेर पडू शकता. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत या 6 गोष्टी.

भूतकाळाचे भूत तुमच्यावर हावी होऊन देवू नका

आचार्य चाणक्य यांनी आपल्या धोरणात स्पष्टपणे नमूद केले आहे की जर तुम्हाला तुमच्या जीवनात सुख आणि शांती हवी असेल तर आयुष्यातून निघून गेलेली गोष्ट तुम्ही पूर्णपणे विसरली पाहीजे. भूतकाळाचे भूत तुमच्यावर हावी होण्याआधी तुम्ही भूतकाळातील गोष्टी विसरायला हव्या. पण तुमच्या चुका लक्षात ठेवून तुम्ही पुढील आयुष्य जगायला हवे. पण जर तुम्ही भूतकाळ विसराला नाहीत तर तुम्ही तुमचा वर्तमान देखील खराब कराल.

वाईट मार्गाने पैसे कमवू नका

आचार्य चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार जो कोणी चारित्र्य सोडून पैसा कमावतो तो जीवनात कधीही चांगले काम करत नाही. यातना सहन करून कमावलेले पैसे कधीही चांगला परिणाम देत नाहीत.

दुष्टांपासून दूर राहण्याचे उपाय

रस्त्यावर पडलेले काटे टाळण्यासाठी पायात जोडे घालतो. याच प्रकारे दुष्ट लोकांना इतके लाजवा की ते तुमच्यापासून दूर जातील. जेणेकरून अशी माणसे आपल्या जवळ कधीच दिसू नयेत.

लक्ष्मी कशी जवळ येईल

आचार्य चाणक्य यांच्या मते,जे लोक स्वच्छता पाळात नाहीत अशा लोकांच्या आयुष्यात लक्ष्मी जास्त काळ टिकत नाही. जिथे स्वच्छता असते तिथेच लक्ष्मी नांदते असे म्हटले जाते.

स्वत: चा शोध घ्या

ज्या व्यक्तीने चार वेद आणि सर्व धर्मग्रंथांचे वाचन केले आहे आणि त्याचे ज्ञान आहे, परंतु त्याला स्वतःच्या आत्म्याचा साक्षात्कार झाला नाही, तो व्यक्ती व्यर्थ आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी स्वत: चा शोध घ्या. स्वत:च्या अनंदासाठी जे आवडेल आणि ज्या पासून कोणाला त्रास होणार नाही अशा गोष्टी करा.

तुमची कमजोरी दाखवू नका

आचार्य चाणक्य यांनी म्हटले आहे की, जर तुम्ही एखाद्यापेक्षा कमकुवत असाल तर तुमची कमजोरी कधीही दाखवू नका. कोणाच्याही समोर स्वतःला कमकुवत दाखवू नका. समोरच्याला तुमची कमजोरी समजल्यावर तो तुम्हाला हरवण्यासाठी त्या कमजोराचा फायदा उठवेल.

इतर बातम्या :

Coconut Remedies : श्रीफळाच्या योग्य वापराने आयुष्यात सुख समृद्धी नांदेल, हे उपाय नक्की करुन पाहा

Indication of Dreams | स्वप्नात या 6 गोष्टी दिसणे म्हणजे छप्परफाड संपत्ती मिळण्याचे संकेत

Guru Nanak Jayanti 2021 | गुरु नानक जयंती कधी असते? काय आहे या सणाचे महत्त्व

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI