AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Guru Nanak Jayanti 2021 | गुरु नानक जयंती कधी असते? काय आहे या सणाचे महत्त्व

शीख धर्मासाठी गुरु नानक जयंती हा मोठा सण आहे. यावर्षी, 19 नोव्हेंबर रोजी, गुरु नानक जयंती (Guru Nanak Jayanti 2021) हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जाईल.

Guru Nanak Jayanti 2021 | गुरु नानक जयंती कधी असते? काय आहे या सणाचे महत्त्व
guru-nanak
| Edited By: Mrunal Patil | Updated on: Nov 16, 2021 | 7:30 AM
Share

मुंबई :  शीख धर्मासाठी गुरु नानक जयंती हा मोठा सण आहे. यावर्षी, 19 नोव्हेंबर रोजी, गुरु नानक जयंती (Guru Nanak Jayanti 2021) हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जाईल. कार्तिक महिन्याच्या अमावास्येला साजरी केली जाते आणि त्यानंतर पंधरा दिवसांनी म्हणजेच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी (कार्तिक पौर्णिमा 2021 तारीख) गुरु नानक जयंती साजरी केली जाते. गुरु नानक जयंतीला प्रकाश पर्व असेही म्हणतात. त्यामुळेच गुरु नानक देव यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र दिवे लावले जातात.गुरु नानक देव यांच्या जयंतीनिमित्त हा खास दिवस साजरा केला जातो.

गुरु नानक जयंतीचा इतिहास

गुरु नानक देव हे शीख धर्माचे पहिले गुरु होते. गुरु नानक देवजी यांचा जन्म इ.स. 1469 रोजी झाला. नानकजींचा जन्म 1469 मध्ये कार्तिक पौर्णिमेला पंजाब (पाकिस्तान) प्रांतातील रावी नदीच्या काठी वसलेल्या तलवंडी नावाच्या गावात झाला. मात्र, आता गुरु नानकजींचे हे जन्मस्थान आता पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील नानकाना साहिबमध्ये आहे. आता या ठिकाणाचे नाव नानक देव म्हणून ओळखले जाते. येथे देश-विदेशातील लोक प्रसिद्ध गुरुद्वारा ननकाना साहिबला भेट देण्यासाठी येतात. असे म्हणतात की हा गुरुद्वारा ‘ननकाना साहिब’ शीख साम्राज्याचे राजा महाराजा रणजित सिंग यांनी बांधला होता.

कोण होते गुरु नानक

गुरू नानक देवजी मूर्तीपूजेला निरर्थक मानत होते आणि ते नेहमी रूढी आणि कर्मकांडाच्या विरोधात होते. यामुळेच गुरू नानकजींनी शीख समाजाचा पाया घातला असे म्हटले जाते. शीख समाजाचे पहिले गुरू गुरु नानक देव जी यांचीही विशेष पूजा याच कारणासाठी केली जाते. गुरु नानक देव यांना त्यांचे भक्त नानक देव, बाबा नानक आणि नानक शाह म्हणतात.नानकजींचा मृत्यू २२ सप्टेंबर १५३९ रोजी झाला. त्यांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी त्यांचे शिष्य भाई लहना यांना उत्तराधिकारी बनवले, जे नंतर गुरु अंगद देव म्हणून ओळखले जाऊ लागले.

टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.

इतर बातम्या :

Coconut Remedies : श्रीफळाच्या योग्य वापराने आयुष्यात सुख समृद्धी नांदेल, हे उपाय नक्की करुन पाहा

Indication of Dreams | स्वप्नात या 6 गोष्टी दिसणे म्हणजे छप्परफाड संपत्ती मिळण्याचे संकेत

बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल… कार्तिक एकादशी निमित्त विठुरायाला फुलांची आकर्षक आरास

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?