
हिंदू धर्मानुसार आपल्या पूर्वजांचं स्मरण करण्यासाठी पितृपक्ष असतो. पितृपक्षालाच पितृपंधरवाडा असं देखील म्हणतात. पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी, त्यांना मोक्ष मिळावा यासाठी पिंडदान आणि तर्पण केलं जातं. या काळात काही विशिष्ट वृक्ष लावणं देखील शुभ मानलं जातं, मात्र जरी पितृपक्षात काही वृक्ष लावणं हे शुभ मानलं जात असलं तरी देखील ती कोणती लावावीत हे देखील लक्षात घेतलं पाहिजे, कारण असे देखील काही वृक्ष आहेत, जी या काळात लावल्यामुळे पितृदोष निर्माण होतो, तसेच या काळात काय खावं आणि काय खाऊ नये याचे देखील नियम आहेत, याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.
हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षात पिंपळ, पळस, या सारख्या वृक्षाचं रोपण करणं शुभ मानलं जातं. त्यामुळे पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते अशी मान्यता आहे. पळसाचं झाड हे घराच्या उत्तर दिशेला लावणं शुभ मानलं जातं, त्यामुळे तुमच्या घरातील वास्तुदोष नाहीसा होऊन, घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो. पळस वृक्ष पितृपक्षात लावल्यामुळे तुमच्या पूर्वजांचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो, असं धर्मशास्त्रामध्ये म्हटलं आहे. पिंपळ आणि पळस हे दोन वृक्ष दीर्घ काळ टिकतात त्यामुळे यांचा संबंध हा कुटुंबाच्या प्रगतीशी देखील जोडला जातो.
ही झांड चुकूनही लावू नका
पितृपक्षात पिंपळ आणि पळस हे दोन वृक्ष लावणं शुभ मानलं गेलं आहे, मात्र अशी देखील काही वृक्ष आहेत, जी पितृपक्षात लावणं निषिद्ध मानलं गेलं आहे. पितृपक्षामध्ये कडू लिंबांचं आणि आंब्यांचं झाड लावू नये, शास्त्रानुसार पितृपक्षात ही दोन झाडं लावणं अशुभ मानलं जातं. तुम्ही जर पितृपक्षात ही झाडं लावली तर घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो, पूर्वज नाराज होतात, असं मानण्यात येतं. पूर्वज नाराज झाल्यास घरात पितृदोष निर्माण होतो.
या भाज्याचं सेवन करू नका
पितृपक्षात वांग्याची भाजी खाऊ नये असं सांगण्यात आलं आहे. या काळात दुधी भोपळ्याचं देखील सेवन करू नये असं मानलं जातं. या दोन भाज्यांचं सेवन पितृपक्षात करणं अशुभ मानलं गेलं आहे. पितृपक्षात आपल्या पूर्वजांच्या नावानं पिंडदान आणि तर्पन केल्यास तुमचे पूर्वज तुमच्यावर प्रसन्न होतात, सर्व प्रकारच्या पितृदोषापासून तुमची सुटका होते.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)