स्वप्नात नाग देवतेची मूर्ती पाहण्याचा अर्थ काय होतो? कसले संकेत असतात?

स्वप्नात नाग देवतेची मूर्ती दिसणे नेमकं कशाचे संकेत असतात. किंवा त्या स्वप्नाचा आपल्या येणाऱ्या दिवसांवर काही परिणाम होतो का? हे देखील जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

स्वप्नात नाग देवतेची मूर्ती पाहण्याचा अर्थ काय होतो? कसले संकेत असतात?
Dream of Nag Dev Murti, Meaning & Significance
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 26, 2025 | 6:45 PM

श्रावण महिना आता सुरू झाला आहे. या महिन्यात अनेकांचे उपवास असतात तसेच व्रत असतात. श्रावण महिना हा भगवान शंकरांना समर्पित असतो. त्यामुळे पहिल्या सोमवारपासूनच महादेवाची आराधना करण्यात भक्त सुरुवात करतात. त्यांचे आशीर्वाद मिळावे म्हणून मनोभावे पूजाही करतात. तसेच या दिवसांमध्ये अनेकांना स्वप्नात पिंड देखील दिसते. त्यावेळी आपली पूजा ही शंकरांपर्यंत पोहोचली असं आपण मानतो. पण जेव्हा स्वप्नात साप दिसतात किंवा सापाची मूर्ती दिसते तेव्हा देखील तो भगवान शंकरांचा आशीर्वादच मानला जातो. पण तरी देखील याचे काही वेगळे संकेत असू शकतात का हे देखील जाणून घेणे महत्त्वाचे असते.

स्वप्नात सापाची मूर्ती दिसली तर काय संकते असतात?

अनेकदा भक्तांना स्वप्नात महादेवाशी संबंधित गोष्टी दिसतात. काही लोकांना स्वप्नात नाग देवाची मूर्ती दिसते, ज्यामुळे त्यांना प्रश्न पडतो की हे कशाचे लक्षण आहे. स्वप्नात नाग देवाची मूर्ती पाहण्याचा अर्थ काय असतो. बऱ्याचदा लोकांना स्वप्नात साप अनेक प्रकारे दिसतात, ज्यांचे वेगवेगळे अर्थ असतात. पण तुम्हाला माहित आहे का स्वप्नात सापाची मूर्ती दिसली तर काय संकते असतात? चला जाणून घेऊयात.

भगवान शिवाच्या आशीर्वादाचे लक्षण

स्वप्नशास्त्रानुसार, स्वप्नात नाग देवतेची मूर्ती पाहणे हे एक शुभ चिन्ह मानले जाते, जे भगवान शिवाच्या कृपेचे प्रतीक असते. हे स्वप्न संपत्ती, समृद्धी आणि यशाचे देखील संकेत देतात. नागदेवता भगवान शिवाशी संबंधित आहे आणि स्वप्नात त्यांची मूर्ती पाहणे हे भगवान शिवाच्या आशीर्वादाचे लक्षण असू शकते. त्यांची कृपा तुमच्यावर आहे हे देखील दर्शवते.

धन, समृद्धी आणि यश दर्शवते

नाग देवाला धन आणि समृद्धीचा रक्षक देखील मानले जाते. स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नात नाग देवाची मूर्ती पाहणे हे धन, समृद्धी आणि यश दर्शवते. स्वप्नात नागाची मूर्ती पाहणे हे सूचित करते की तुम्हाला लवकरच आर्थिक लाभ मिळू शकतो किंवा तुमची संपत्ती वाढू शकते.

सकारात्मक बदलाचे लक्षण

धार्मिक मान्यतेनुसार, स्वप्नात सापाची मूर्ती पाहणे हे देखील यश आणि सकारात्मक बदलाचे लक्षण असू शकते. हे स्वप्न तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगले घडणार आहे आणि तुमचे सर्व प्रलंबित काम पूर्ण होईल असे दर्शवते.

संरक्षण आणि सुरक्षिततेचे प्रतीक

हिंदू धर्मात, नाग देवता संरक्षण आणि सुरक्षिततेचे प्रतीक मानली जाते. अशा परिस्थितीत, स्वप्नात नाग देवाची मूर्ती पाहणे हे सूचित करते की तुम्ही सुरक्षित असल्याचं मानलं जातं.

( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)