इंजिनिअर हरले, तंत्रज्ञानही फेल! एक इंचही नाही हालली 170 वर्ष जुनी हनुमानाची मूर्ती, कुठं घडला चमत्कार?
Ujjain Khade Hanuman Idol : उज्जैन शहरातील एका कथित चमत्काराची सध्या देशभरात तुफान चर्चा सुरू आहे. येथील 170 वर्ष जुनी हनुमान मूर्ती हटवण्यासाठी इंजिनिअर आले, तंत्रज्ञानाचा वापर केला. पण बजरंबलीसमोर सगळं काही फेल गेलं. मंदिर पाडण्यात आलं. पण मूर्ती एक इंचही जागची हालवता आली नाही . काय आहे हे प्रकरण?

उज्जैन शहरातील एका कथित चमत्काराची सध्या देशभरात आणि हनुमान, रामभक्तात जोरदार चर्चा सुरू आहे. उजैनमध्ये सिंहस्थ महाकुंभ 2028 ची पूर्वतयारी सुरू आहे. त्यासाठी अनेक ठिकाणी रस्त्याचे रूंदीकरण आणि इतर विकास कामांनी वेग घेतला आहे. कंठाल ते छत्री चौक या मुख्य मार्गाच्या विस्तारणीकरणासाठी रस्त्याच्या मध्यभागी असलेले 170 वर्षे जुने खडे हनुमान मंदिर हटवण्याचा निर्णय सरकारने घेतला. मंदिर पाडल्या गेले. पण खडे हनुमानाची मूर्ती मात्र एक इंचही हटली नाही. इंजिनिअर आले, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. दोन दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर मूर्ती तसूभरही हलली नाही, त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली.
इंजिनिअर्संनी हात टेकले, तंत्रज्ञानही फेल
रस्ता रुंदीकरणासाठी ही मूर्ती स्थलांतर करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशासनाने अगोदर मंदिरांचे बाह्य बांधकाम पाडले. त्यानंतर मूर्ती सुरक्षितपणे नवीन ठिकाणी हलवण्यासाठी इंदूरहून विशेष इंजिनिअर आणि तांत्रिक तज्ज्ञांची टीम पाचारण करण्यात आली. क्रेन आणि इतर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. दोन दिवसांच्या प्रयत्नानंतरही मूर्ती मात्र हलली नाही. अखेर प्रशासनाने हात टेकले. याच ठिकाणी मूर्तीवर टेंट उभारून तिथेच पूजा-अर्चा सुरू करण्यात आली.
हिंदू संघटना आक्रमक
ही मूर्ती हलवता न आल्याने स्थानिक नागरिकांनी आणि हिंदू संघटनांनी त्याला दैवी शक्तीचा चमत्कार असल्याचा दावा केला आहे. देवाचीच इथून न हटण्याची इच्छा असल्याचे भाविक भक्तांचे म्हणणे आहे. या घटनेनंतर हिंदू संघटनांनी घटनास्थळी दाव घेतली. त्यांनी महाआरती केली. बालविजय मस्त हनुमान मंदिराचे पुजारी सुलभ शांतनु शर्मा यांनी सांगितले की, दोन्ही बाजूने मार्ग उपलब्ध आहे. प्रशासनाने निर्णयावर पुनर्विचार करावा असे आवाहन त्यांनी केले. जर मूर्तीला कोणतीही हानी न पोहोचवता सुरक्षित स्थलांतरित करण्याची लिखीत हमी प्रशासनाने देण्याची मागणी करण्यात आली. नाहीतर मूर्ती हलवण्यास विरोध करण्यात येईल असे भाविकांनी बजावले.
पुरातत्व विभाग करणार स्कॅनिंग
परिस्थितीचे गांभीर्य ओळखत तहसीलदार शेफाली जैन यांनी मूर्ती हलवण्याची प्रक्रिया तातडीने थांबवली. आता पुरातत्व विभागाचे पथक अत्याधुनिक संगणकीय मशीन्सच्या मदतीने मूर्तीचा पाया, तिची जमीनखालील रचना आणि मातीचे स्कॅनिंग करणार आहे. हा अहवाल येईपर्यंत पुढील कारवाई थांबवण्यात आली आहे.