AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BJP Election Fund : बंगालसह तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपला मिळाला प्रचंड पैसा, आकडा वाचून तुमचे डोळे विस्फारतील

BJP Election Fund: 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला देणगी देणाऱ्यांची जणू रांग लागली. या काळात भाजपला प्रचंड पैसा मिळाला. आसाम, तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये पक्षाने एकूण 160 कोटी रुपये खर्च केले.

BJP Election Fund : बंगालसह तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपला मिळाला प्रचंड पैसा, आकडा वाचून तुमचे डोळे विस्फारतील
बंगालसह तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपला मिळाला प्रचंड पैसाImage Credit source: एजन्सी
| Updated on: Sep 09, 2026 | 12:32 PM
Share

यंदा आसाम, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकीत पक्षाचा खर्च आणि देणगी यांचा ताळेबंद भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर केला आहे. 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला देणगी देणाऱ्यांची जणू रांग लागली. या काळात भाजपला प्रचंड पैसा मिळाला. प्राप्त आकडेवारीनुसार, पक्षाला 1,472.8 कोटी रुपये मिळाले. पश्चिम बंगाल आणि केरळमधील आकडेवारी पक्षाने आयोगासमोर मांडली. तर आसाम, तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये पक्षाने एकूण 160 कोटी रुपये खर्च केले. या आकडेवारीनुसार, निवडणूक संपल्यानंतर पार्टीच्या खात्यातील शिल्लक रक्कम वाढून 7,627.2 कोटी रुपये इतकी झाली. तर 15 मार्च 2026 रोजी ही रक्कम 6,722.6 कोटी रुपये इतकी होती. या कालावधीत पक्षाच्या फंडात जवळपास 904.6 कोटी रुपयांची वाढ झाली.

पक्षाने कुठे खर्च केली रक्कम?

आसाम, तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये भाजपच्या केंद्रीय मुख्यालयाशी संबंधित राज्य आणि जिल्ह्यात एकूण 160 कोटी रुपये खर्च केले. यामध्ये आसाममध्ये 96.3 कोटी रुपये, तामिळनाडूमध्ये 51.6 कोटी रुपये तर पुद्दुचेरीमध्ये 11.9 कोटी रुपये खर्च करण्यात आले. यापैकी निवडणूक खर्चासाठी पक्षाने 130.4 कोटी रुपये खर्च केले. तर 29.6 कोटी रुपये उमेदवारांना एकरक्कमी देण्यात आले. इतर कामासाठी रुपये खर्च करण्यात आले. पश्चिम बंगाल, केरळ या राज्यातील निवडणूक खर्चाचा तपशील निवडणूक आयोगाने अद्याप जाहीर केलेला नाही.

आसाममध्ये सर्वाधिक खर्च

भाजपने आसाममधील निवडणुकीवर खर्चावरील आकडेवारीनुसार, पक्षाने प्रचारासाठी 76.7 कोटी रुपये खर्च केले. यामध्ये केंद्रीय संस्थेने 23.1 कोटी रुपये तर उमेदवारांवर 19.5 कोटी रुपये खर्च करण्यात आले. आसाममध्ये स्टार प्रचारकाच्या प्रवासावर 27.3 कोटी रुपये, जाहिरातींवर 37 कोटी, प्रचा साहित्यावर 8.9 कोटी रुपये तर राज्यातील इतर खर्च 2.3 कोटींच्या घरात पोहचला. उमेदवारांना एकूण 19.4 कोटी रुपये देण्यात आले. तर उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी प्रकाशित करण्यासाठी 16.7 लाख रुपये खर्च करण्यात आले.

तामिळनाडू राज्यात 51.6 कोटी रुपये खर्च

तामिळनाडू राज्यात BJP ने एकूण 51.6 कोटी रुपये खर्च केले. निवडणूक प्रचारासाठी 44.5 कोटी रुपये खर्च करण्यात आले. तर उमेदवारांसाठी जवळपास 7 कोटी रूपये खर्च करण्यात आला. पुद्दुचेरीमध्ये भाजपचा एकूण निवडणूक खर्च 11.9 कोटी रुपये इतका होता. तर काँग्रेसने या विधानसभा निवडणुकीत एकूण 248.6 कोटी रुपये खर्चाची माहिती दिली आहे.

Follow Us
पावसाने दिली दडी अन् शेतकरी संकटात! विदर्भातील जवळपास 20 तालुक्यांत...
Farmers Issue | पावसाने दिली दडी अन् शेतकरी संकटात! विदर्भातील जवळपास 20 तालुक्यांत 20-22 दिवसांपासून पाऊसच नाही
राज ठाकरेंवर अश्लील वक्तव्य करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला मनसेचा दणका!
MNS | राज ठाकरेंवर अश्लील वक्तव्य करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला मनसेचा दणका! नेमकं कारण काय?
धनुष्यबाण हे बाळासाहेबांच्या शिवसेनेचं चिन्ह! संजय राऊत आक्रमक...
Sanjay Raut | धनुष्यबाण हे बाळासाहेबांच्या शिवसेनेचं चिन्ह! संजय राऊत आक्रमक; चिन्ह गोठवण्याची केली मागणी
तुम्ही दुसऱ्यासाठी शेठ असाल, माझ्या नादाला लागायचं नाही! मनोज जरांगे..
Manoj Jarange Patil Andolan | तुम्ही दुसऱ्यासाठी शेठ असाल, माझ्या नादाला लागायचं नाही! मनोज जरांगे पाटलांचा भरत गोगावले यांना थेट इशारा
गणेश आगमनाआधीच विघ्न! धारावीत स्पीड ब्रेकरवर ट्रॉलीचा तोल गेला अन्...
Ganpati Idol Collapsed | गणेश आगमनाआधीच विघ्न! धारावीत स्पीड ब्रेकरवर ट्रॉलीचा तोल गेला अन्, पुढे जे झालं...
DJच्या आवाजावर अमृता फडणवीस स्पष्टच बोलल्या! सण साजरे करा, पण...
Amruta Fadnavis | DJच्या आवाजावर अमृता फडणवीस स्पष्टच बोलल्या! सण साजरे करा, पण...
ओबीसी आरक्षण संपल्याचं मुख्यमंत्र्यांना सांगणार! हाकेंची मोठी घोषणा
Laxman Hake | ओबीसी आरक्षण संपल्याचं मुख्यमंत्र्यांना सांगणार! लक्ष्मण हाकेंची मोठी घोषणा; पुढे म्हणाले...
धनंजय मुंडे यांचं थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र; नेमकं कारण काय?
Dhananjay Munde | धनंजय मुंडे यांचं थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र; नेमकं कारण काय?
मुंबईतील नगरसेवकांना मोठी खुशखबर! 12 वर्षांनंतर निधीत भरघोस वाढ...
Corporator's Funds | मुंबईतील नगरसेवकांना मोठी खुशखबर! 12 वर्षांनंतर निधीत भरघोस वाढ; 60 लाखांऐवजी आता मिळणार तब्बल...
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर रोहित पवारांचं मोठं विधान!
Rohit Pawar | राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर रोहित पवारांचं मोठं विधान! अजितदादांच्या गटाने भाजपची साथ सोडली तर...