Pradosh Vrat 2025: भौम प्रदोष व्रताच्या दिवशी ‘या’ चुका केल्यास तुमच्यावर कोसळेल दुख:चा डोंगर…
Pradosh Vrat Pooja: हिंदू धर्मात प्रदोष व्रत खूप खास मानले जाते. मंगळवारी येणाऱ्या प्रदोष व्रताला भौम प्रदोष व्रत म्हणतात. या दिवशी भगवान शिवाची पूजा आणि उपवास करण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की प्रदोष व्रत केल्याने जीवनातील सर्व दुःख दूर होतात. भौम प्रदोष व्रताच्या दिवशी काही कामे करण्यास मनाई आहे. या दिवशी कोणती कामे करू नयेत चला जाणून घेऊया.

हिंदू धर्मामध्ये प्रदोष व्रताला अत्यंत खास मानले जाते. प्रदोष व्रत दर महिन्याला केले जाते. प्रत्येक महिन्यातील शुक्ल आणि कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत साजरा केला जातो. प्रदोष व्रताच्या दिवशी महादेवाची पूजा केली जाते. या दिवशी व्रत आणि पूजा केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर करण्यास मदत होते. प्रदोष व्रत केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण होते आणि तुमचे सर्व महत्त्वाच्या गोष्टी आणि इच्छा पूर्ण करण्यास मदत होते. हिंदू धार्मिक शास्त्रानुसार, प्रदोष व्रताच्या दिवशी सकारात्मक मनानी महादेवाची पूजा केल्यामुळे आणि उपवास केल्यामुळे तुम्हाला अनेक फायदे होतात. धार्मिक श्रद्धेनुसार, प्रदोषाचे उपवास आणि पूजा केल्याने भक्तांना...
