
हिंदू धर्मामध्ये अनेक व्रत आणि सण अगदी उत्साहात साजरी केली जातात. धार्मिक ग्रंथानुसार, प्रदोष व्रताला भरपूर महत्त्व दिले जाते. प्रदोष व्रताच्या दिवशी महादेवाची पूजा आणि व्रत केले जाते. महादेवाला देवांचे देव म्हटले जाते ज्यामुळे तुम्ही जर प्रदोष व्रताच्या दिवशी व्रत केल्यास तुम्हाला महादेवाचा आशिर्वाद मिळण्यास मदत होते. तुमच्या आयुष्यातील संकट दूर करण्यासाठी आणि महत्त्वाच्या कामामध्ये प्रगती होण्यासाठी महादेवाचा आशिर्वाद मिळणे गरजेचे असते. प्रदोष व्रताच्या दिवशी पूजा आणि उपवास केल्यामुळे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्यास मदत होते. प्रदोष व्रताचा दिवस महादेवाला समर्पित होता. या दिवशी मनापासून महादेवाची पूजा केल्यामुळे आशिर्वाद मिळण्यास मदत होईल.
प्रदोष व्रताच्या दिवशी महादेवाचे आशिर्वाद प्राप्त होण्यास मदत होते. महादेवाचा आशिर्वाद मिळवण्यासाठी प्रदोष व्रताचा दिवस महत्त्वाचा मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, प्रदोष व्रताच्या दिवशी महादेवाची पूजा केल्यामुळे भक्तांचे सर्व त्रास दूर होण्यास मदत होते. त्यासोबतच या दिवशी व्रत केल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये सुख शांती आणि समृद्धी मिळण्यास मदत होते. प्रदोष व्रताच्या दिवशी महादेवाचे आशिर्वाद मिळाल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात.
पंचांगानुसार, फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी 11 मार्च रोजी सकाळी 8:13 वाजता सुरू होईल आणि त्रयोदशीची तिथी 12 मार्च रोजी सकाळी 9:11 वाजता संपेल. अशा परिस्थितीत, 11 मार्च 2025 रोजी प्रदोष व्रत साजरा केला जाईल. प्रदोष पूजेचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 6:47 ते रात्री 9:11 पर्यंत असेल. प्रदोष उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठा, स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला. घरातील मंदिरात महादेवाची मूर्ती किंवा चित्र स्थापित करा. त्यानंतर महादेवाला पाणी, दूध, दही, मध, तूप, गंगाजल, फुले, फळे, मिठाई आणि तुमच्या आवडत्या मिठाई अर्पण करा. त्यानंतर महादेवाची आरती करा आणि तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांना प्रार्थना करा. दिवसभर उपवास ठेवा आणि संध्याकाळी महादेवाला नैवेद्य अर्पण करून उपवास सोडा. उपवास सोडल्यानंतर, गरीब आणि गरजूंना दान करा.
प्रदोष व्रताच्या वेळी तुमच्या राशीनुसार दान करा.
प्रदोष व्रताच्या दिवशी या नियमांचे पालन केल्याने भगवान शिवाचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनात सुख-समृद्धी येते.
मान्यतेनुसार, प्रदोष व्रत केल्याने भगवान शिवाचे विशेष आशीर्वाद मिळतात आणि प्रदोष व्रत केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. प्रदोष व्रत केल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. यासोबतच, प्रदोष व्रत केल्याने कुंडलीतील चंद्रदोष दूर होतो आणि प्रदोष व्रत केल्याने वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात. प्रदोष उपवास ठेवल्याने करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता निर्माण होते.