Chaitra Navratri 2025: चैत्र नवरात्रीमध्ये ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या घटस्थापनेची योग्य वेळ…. फक्त एका क्लिकवर
Chairatra Navratri 2025: नवरात्री दरम्यान, भक्त दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा करतात. असे मानले जाते की जो कोणी माता भगवतीच्या नऊ रूपांची पूजा करतो त्याला जीवनातील सर्व दुःखांपासून मुक्तता मिळते. तर या वर्षी घटस्थापणा कधी करायची चला जाणून घ्या.

हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सण अगदी उत्साहामध्ये साजरा केले जातात. प्रत्येक सणाचे ते मासिक असो किंवा वार्षित त्याला विशेष महत्त्वं दिले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, दुर्गा देवीला शक्तीचे स्वरूप मानले जाते. नवरात्रीमध्ये शक्तीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. देशभरामध्ये नवरात्र अगदी उत्साहामध्ये साजरा केली जाते. नवरात्रीच्या दिवसामध्ये दुर्गा देवीची पूजा आणि उपवास केला जातो. असे मानले जाते की, नवरात्रीच्या दिवसांमध्ये उपवास आणि पूजा केल्यामुळे तुमच्यावर देवी दुर्गेचे आशिर्वाद राहातात. त्यासोबतच तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मकता वाढते. अनेकदा तुमच्या महत्त्वाच्या कामामध्ये अडथळे निर्माण होतात. यामुळे तुमची प्रगती होत नाही.
नवरात्रीमध्ये पूजा केल्यामुळे तुमच्या आयुष्यामधील सर्व समस्या दूर होतात त्यासोबतच तुमच्यावर दुर्गा देवीची कृपादृष्टी कायम राहाते. नवरात्रीच्या दिवसामध्ये तुमच्या घरातील वारावरण शद्ध आणि सकारात्मक होते. धार्मिक ग्रंथांनुसार, नवरात्रीचे व्रत वर्षातून चार वेळा केला जातो. चार नवरात्रींपैकी 2 गुप्त नवरात्री असतात आणि 2 प्रत्यक्ष नवरात्री असतात. चैत्र महिन्यामध्ये येणाऱ्या नवरात्रीला प्रत्यक्ष नवरात्री असते. याशिवाय, शारदीय नवरात्र देखील दिसून येते जी आश्विन महिन्यात येते.
हिंदू कॅलेंडरनुसार, चैत्र नवरात्र चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून सुरू होते. हिंदू नववर्षाची सुरुवातही याच दिवसापासून होते. धार्मिक श्रद्धेनुसार, नवरात्रीची सुरुवात शाश्वत ज्योत आणि कलशाच्या स्थापनेने होते. चैत्र नवरात्रीमध्ये कलश स्थापना करण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे ते जाणून घेऊया. चैत्र नवरात्रीची सुरुवात म्हणजेच प्रतिपदा तिथी 29 मार्च 2025 रोजी दुपारी 4:27 वाजता सुरू होईल आणि 30 मार्च रोजी दुपारी 12:49 वाजता संपेल. उदय तिथीनुसार, चैत्र नवरात्र रविवार, 30 जानेवारी 2025 रोजी सुरू होईल. वैदिक कॅलेंडरनुसार, चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेचा शुभ मुहूर्त सकाळी 6:13 ते 10:22 पर्यंत असेल. या काळात भाविकांना एकूण 4 तास 8 मिनिटे वेळ मिळेल. याशिवाय, घटस्थापनेचा अभिजीत मुहूर्त दुपारी 12:01 ते 12:50 पर्यंत असेल. अशा परिस्थितीत, भाविकांना एकूण 50 मिनिटे मिळतील. अभिजित मुहूर्तात भाविक घटस्थापना देखील करू शकतात.
चैत्र नवरात्रीमध्ये ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा…. चैत्र नवरात्रीमध्ये उपवास करणाऱ्यांनी दिवसा झोपणे टाळावे. चैत्र नवरात्रीमध्ये स्वच्छ कपडे घालावेत आणि कपडे आणि चामड्यापासून बनवलेल्या वस्तूंपासून दूर राहावे आणि काळे कपडे घालणे देखील टाळावे. चैत्र नवरात्रीत मुले, गर्भवती महिला आणि गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांनी हा उपवास करू नये. चैत्र नवरात्रीच्या काळात चुकूनही महिलांचा अपमान करू नये. चैत्र नवरात्रीत आनंदी वातावरण राखले पाहिजे. चैत्र नवरात्रीमध्ये उपवास करणाऱ्या व्यक्तीने कुठेही राहणे टाळावे. चैत्र नवरात्रीच्या काळात देवीच्या मंत्रांचा जास्तीत जास्त जप करावा.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
